मुंबई : धोंडो केशव कर्वे हे एक भारतीय समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांनी महिलांच्या शिक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आणि हिंदू विधवांच्या पुनर्विवाहासाठी संघटनांची बांधणी केली.
महर्षी कर्वे या नावाने ते प्रसिद्ध आहेत. भारतातील महिला सक्षमीकरणाचा मार्ग दाखविणारा पुरुष अशी त्यांची ओळख असून त्यांचा जन्म १८ एप्रिल १८५८ रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात झाला. हेही वाचा - What is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष ?’
कर्वे हे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक होते. आधुनिक विचारवंत म्हणून त्यांनी समजाला दिशा दाखवली.
विधवा पुनर्विवाहाबाबत तत्कालीन समाजाच्या सनातनी विचारसरणीला छेद देण्यासाठी मोहीम सुरू केली. त्यासाठी त्यांनी १८९३ मध्ये विधवा विवाह संघाची स्थापना केली. त्याच वर्षी पुराणमतवादी समाजाच्या विरोधात जाऊन त्यांनी एका विधवेशी लग्न केले. त्यांची पहिली पत्नी १८९१ मध्ये मरण पावली होती.
१८९६ मध्ये कर्वे यांनी पुण्यात हिंदू विधवा गृह या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. जर विधवा पुनर्विवाह करू शकत नसतील तर त्यांच्यात स्वतःचे पालनपोषण करण्याची क्षमता यायला हवी असा त्यामागील हेतू होता.
कर्वे यांना स्त्रियांमधील निरक्षरतेबद्दल अधिकाधिक चिंता वाटू लागली, म्हणून १९१६ मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयातून सेवानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी मुंबईत श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरे ( SNDT university history) महिला विद्यापीठ सुरू केले. हे भारतातील पहिले महिला विद्यापीठ आहे.
नंतर त्यांनी गावातील प्राथमिक शिक्षणासाठी सोसायट्यांची स्थापना आणि जात निर्मूलन करण्यासाठी सामाजिक सुधारणांच्या प्रयत्नांची व्याप्ती वाढवली. कर्वे यांचे आत्मचरित्र १९१५ मध्ये प्रकाशित झाले.
१९५८ मध्ये त्यांच्या १०० व्या जयंतीदिनी त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' मरणोत्तर प्रदान करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.