गर्भवती महिलांसाठी भन्नाट योजना! प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतून महिलांना आता मिळणार ६००० रुपये; पण, 'इथे' नोंदणी करावी लागणार

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत आता गर्भवती महिलांना पहिल्या अपत्यासाठी दोन टप्प्यात पाच हजारांचा लाभ मिळणार आहे. तर १ एप्रिल २०२२नंतर जन्मलेल्या दुसऱ्या अपत्यासाठी (फक्त मुलगी) सहा हजार रुपये एकावेळी दिले जाणार आहेत.
health department
health departmentsakal
Updated on

सोलापूर : प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत आता गर्भवती महिलांना पहिल्या अपत्यासाठी दोन टप्प्यात पाच हजारांचा लाभ मिळणार आहे. तर १ एप्रिल २०२२नंतर जन्मलेल्या दुसऱ्या अपत्यासाठी (फक्त मुलगी) सहा हजार रुपये एकावेळी दिले जाणार आहेत. पण, बाळ साडेतीन महिन्याचे झाल्यावर लस टोचल्यानंतर ही रक्कम मिळणार आहे. तत्पूर्वी, पहिल्या अपत्यासाठी तीन टप्प्यात ५ हजार रुपये दिले जात होते.

योजनेचे उद्दिष्ट गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना मजुरी कमी मिळते. त्या नुकसानीची भरपाई मिळावी, जेणेकरून बाळाच्या जन्मापूर्वी आणि नंतर पुरेशी विश्रांती घेण्यास प्रोत्साहन मिळेल या हेतूने योजनेत बदल करण्यात आला आहे. मात्र, वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिला किंवा सार्वजनिक उपक्रमातील महिला व सध्या लागू असलेल्या कोणत्याही समान योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. योजनेच्या लाभासाठी ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका-सेवक, अधिपरिचारीका, प्राथमिक आरोग्य केंद्र- उपकेंद्रे, तालुका आरोग्याधिकारी कार्यालय, नागरी भागासाठी देखील अशीच यंत्रणा मदतीसाठी असणार आहे. सीईओ मनिषा आव्हाळे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू आहे.

लाभासाठी आवश्यक कागदपत्रे...

  • मातेचे आधार कार्ड व मोबाईल क्रमांक

  • मातेचे आधारसंलग्न राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक किंवा पोस्टाचे पासबुक झेरॉक्स

  • आरोग्य विभागाकडील नोंदणी कार्ड व बाळाचे लसीकरण नोंदणी कार्ड

  • बाळाचा जन्म दाखला

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी (यापैकी कोणतेही एक)

  • वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला

  • अनुसूचित जाती- जमातीतील महिलांना जातीचा दाखला

  • ४० टक्के किंवा पूर्णतः दिव्यांग महिला

  • बीपीएल शिधापत्रिकाधारक महिला

  • आयुष्यमान भारतअंतर्गत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे लाभार्थी

  • ई श्रम कार्ड असलेल्या महिला.

  • किसान सन्मान निधीअंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी

  • मनरेगा जॉब कार्ड असलेली महिला

  • गर्भवती, स्तनदा आशा कार्यकर्ती, अंगणवाडीसेविका, अंगणवाडी मदतनीस

  • राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत शिधापत्रिका मिळालेल्या महिला लाभार्थी

योजनेसाठी ‘या’ ठिकाणी करता येईल नोंदणी

योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी १८ ते २२ डिसेंबर दरम्यान लाभार्थ्यांच्या नोंदणीची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील पहिल्या खेपेच्या (शेवटच्या मासिक पाळीच्या तारखेपासून ५१० दिवसातील) म्हणजे जुलै २०२२ पासूनच्या गरोदर माता, तसेच १ एप्रिल २०२२ नंतर दुसरी मुलगी झालेल्या मातांची नोंदणी केली जात आहे. तसेच लाभार्थी स्वतः: प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे स्वत:ची नोंदणी करू शकतो. त्यासाठी केंद्र शासनाच्या https://pmmvy.wcd.gov.in वरील अर्ज भरावा लागणार आहे. नोंदणी व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर लाभार्थींच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.