फळे, भाजीपाला विक्रेत्यांच्या फायद्याची भन्नाट छत्री! सिद्धेश्वर कन्या प्रशालेतील अमृताची ‘बहुउपयोगी अम्ब्रेला’; ५५० रुपयांत हवा, प्रकाशही मिळेल

इयत्ता दहावीतील अमृता कलबुर्गी हिने रस्त्यांवरील फळे, भाजीपाला विक्रेत्यांच्या सोयीसाठी बहुपयोगी छत्री बनविण्याचा निश्चय केला. अवघ्या साडेपाचशे रुपयांत अमृताने छत्री तयार केली आणि राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात या प्रकल्पाला पहिला क्रमांक मिळाला हे विशेष.
solapur
solapursakal
Updated on

सोलापूर : सिद्धेश्वर कन्या प्रशालेतील सिद्ध इनोव्हेटिव्ह लॅबमार्फत इलेक्ट्रॉनिक्स व रोबोटिक्स विषयी माहिती मिळाली आणि प्रशालेतील इयत्ता दहावीच्या वर्गातील अमृता कलबुर्गी हिने रस्त्यांवरील फळे, भाजीपाला विक्रेत्यांच्या सोयीसाठी बहुपयोगी छत्री बनविण्याचा निश्चय केला. अवघ्या साडेपाचशे रुपयांत अमृताने छत्री तयार केली आणि राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात या प्रकल्पाला पहिला क्रमांक मिळाला हे विशेष.

सिद्धेश्वर संस्थेतील गुणवत्ता वाढ समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजशेखर येळीकर मार्गदर्शन करताना प्रत्येक विद्यार्थिनींनी आपापल्या प्रकल्पाचा समाजाला कसा उपयोग होईल व कमीत कमी खर्चात तो कसा तयार होईल, असा त्यांचा आग्रह होता. सोलापूर जिल्ह्यात दहा महिने उन्हाळा व काही काळच पावसाळा असतो. अशा परिस्थितीत जे रस्त्यावर भाजी, फळे किंवा खाद्यपदार्थांसह अन्य वस्तू विकत बसलेले असतात, त्या व्यक्तींकडे प्रामुख्याने छत्री असते. त्यांना दिवसा उन्ह आणि रात्री अंधाराच्या समस्येला सामोरे जावे लागते.

शाळेतून जाताना अमृताने हे निरीक्षण नोंदविले होते. त्यामुळे या उन्हापासूनच विक्रेत्यांना जर थंडावा मिळाला तर असा विचार तिने केला. मग त्या छत्रीवरच एक छोटासा सोलर पॅनेल बसवला आणि आतील बाजूला फॅन व लाईटची सोय केल्यास रस्त्यांवरील विक्रेत्यांना त्या छत्रीचा वापर सोयीचा होईल. पण, पावसाळ्यात कसे हाही प्रश्न होताच. त्यावरही उपाय शोधून अमृताने पावसाळ्यात उंचावरून पडणाऱ्या पाण्याचा उपयोग करून छत्रीच्या वरच्या टोकाला एक उभी फॅनी पाती बसवली.

पावसाच्या पाण्याने पाती फिरतील व जर तिथे एखादा मिनी जनरेटर बसवला तर त्यातून लाईटची सोय होईल असा हा प्रकल्प होता. याशिवाय प्रकल्पाचा उपयोग मोठमोठ्या रिसोर्ट व गार्डन, हॉटेल्समध्येही त्या छत्रीखाली बसून जेवण करता येईल, असा हा समाजोपयोगी प्रकल्प अमृताने अवघ्या काही दिवसांत साकारला आणि राज्यात पहिला क्रमांक पटकावला.

अवघा ५५० रूपयांचा खर्च

बहुपयोगी छत्री तयार करण्यासाठी ५५० रुपये खर्च झाला. एकदा सोलर पॅनेल्स लावला की वर्षानुवर्षे छत्रीचा वापर करता येतो. तसेच छत्री सहजपणे उघडझाप देखील करता येते. या प्रकल्पासाठी मुख्याध्यापिका संगीता गोटे, प्रशालेतील विज्ञान विभागप्रमुख डी. डी. पाटील यांच्यासह सर्वांचेच मार्गदर्शन लाभले.

- अमृता कलबुर्गी, विद्यार्थिनी, सिद्धेश्वर कन्या प्रशाला, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.