Farm News: मशागतीसाठी शेतकऱ्यांचा कल आधुनिक शेतीकडे वाढल्याने सुतार व्यवसाय संकटात

शेतकरयांची ट्रॅक्टर सह लोखंडी औजाराला पसंती. , मशागतीची पारंपारीक लाकडी अवजारे हद्दपार
Farm News: मशागतीसाठी शेतकऱ्यांचा कल आधुनिक शेतीकडे वाढल्याने सुतार व्यवसाय संकटात
Updated on

Paithan News: पैठण तालुक्यातील आडुळ सह परिसरात पूर्वी शेतीची मशागत व पेरणीसाठी वापरली जाणारी सर्व अवजारे ही लाकडापासून बनवली जात होती. मात्र सध्याच्या आधुनिकीकरणाच्या युगामुळे आता बहुतांश शेतकरी हे ट्रॅक्टर द्वारे मशागत व पेरणी करीत आहेत.

बैलांच्या साह्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडील लाकडी अवजारे आता लुप्त होवुन हद्दपार झाल्यात जमा असून त्यांची जागा आता लोखंडी अवजारांनी घेतली आहे यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणारा सुतार व्यवसाय ही शेवटची घटिका मोजत असल्याने सुतार कारागीरांवर उपासमारीची वेळ आली आहे.

Farm News: मशागतीसाठी शेतकऱ्यांचा कल आधुनिक शेतीकडे वाढल्याने सुतार व्यवसाय संकटात
Farm Protesters: दिल्लीकडं पुन्हा येणार शेतकऱ्यांचं वादळ! पंजाब ते राजस्थानच्या शेतकऱ्यांची शंभू बॉर्डरकडं कूच

उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात नवीन लाकडी अवजारे बनवण्यासाठी तसेच जुन्या अवजारांची दुरुस्ती करण्यासाठी सुतारांकडे शेतकऱ्यांच्या रांगा लागत होत्या काही धान्याच्या रूपाने तर काही पैशाच्या रूपाने अवजारे बनवून मिळत असत.

यासाठी शेतकऱ्यांना स्वतःचे लाकूड सुतारांना आणून द्यावे लागत होते यातून सुतार वखर, तीफण,कोळपे, डुबा, मोगडा, बैलगाडीसह इतर अवजारे बनवून देत होता कालांतराने नवीन नवीन उपकरणाचा शोध लागत गेला आणि शेतकऱ्यांना लागणारी अवजारे ही लोखंडापासून बनवली जाऊ लागली लोखंडापासून बनवलेली अवजारे हलकी सोपी व सुटसुटीत असल्याने शेतकऱ्यांचा कल नंतर तिकडे झुकला.

Farm News: मशागतीसाठी शेतकऱ्यांचा कल आधुनिक शेतीकडे वाढल्याने सुतार व्यवसाय संकटात
Pearl Farming : कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात पिकणार खरेखुरे 'मोती'; जाणून घ्या नेमकं प्रकरण?

मात्र याही पुढे नंतर यांत्रिकीकरण व आधुनिक युग आल्यामुळे ट्रॅक्टरद्वारे मशागत व पेरणीकडे शेतकरी वळले मात्र अजूनही काही शेतकरी शेतीकामासाठी बैलांचा उपयोग करीत आहेत गेल्या काही वर्षापासून शेतकरी ट्रॅक्टर द्वारे मशागत व पेरणी करीत आहेत यात त्यांचा वेळ व श्रम वाचत आहे.

मशागत महाग पण घंटो का काम मिनंटो मे होत असल्याने कल वाढला

डिझेलचे दर हे गगणाला भिडले असल्याने ट्रॅक्टर मालकांनीही मशागतीचे दर वाढवले आहेत त्यामुळे मशागतीसाठी सुद्धा शेतकरी वर्ग अडचणीत आले आहेत तसेच वाढत्या महागाईने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले असून आर्थिक संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत जरी असला तरी घंटो का काम मिनंटो मे होत असल्याने शेतकरी ट्रॅक्टरच्या मशागतीलाच पसंती देत आहेत.

पूर्वीच्या काळात सुतार कारागीराकडे शेतकरी पावसाळ्याच्या सुरुवातीला नवीन अवजारे बनवण्यासाठी अथवा दांड्या बसवण्यासाठी येवुन शेतकरी कारागिरांची मनधरणी करत असताना दिसून येत होते मात्र लोखंडी अवजारे आल्यानंतर हळूहळू सुतारांचा व्यवसाय मागे पडल्याने त्यांचा पारंपारिक व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे.

Farm News: मशागतीसाठी शेतकऱ्यांचा कल आधुनिक शेतीकडे वाढल्याने सुतार व्यवसाय संकटात
Dragon Fruit Farming : ‘वकील’ शेतकरी रमलाय ‘ड्रॅगन फ्रूट’ शेतीत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.