Ganpat Gaikwad: भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणीत मोठी वाढ; पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल

Ganpat Gaikwad: कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणीत आणखी वाढत आहेत. पोलीस स्टेशनमधील गोळीबार प्रकरणानंतर गणपत गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली आहे.
Ganpat Gaikwad
Ganpat GaikwadEsakal
Updated on

कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणीत आणखी वाढत आहेत. पोलीस स्टेशनमधील गोळीबार प्रकरणानंतर गणपत गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर आता गणपत गायकवाड यांच्याविरोधात उल्हासनगर-हिल लाईन पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.

अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील जमिनीच्या वादातून आमदार गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात आमदार गायकवाड यांना अटक देखील करण्यात आली आहे. त्यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्यावर आणखी एक अट्रोसिटीचा गुन्हा हिललाईन पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. द्वारली गावातील जाधव या शेतकऱ्यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. आमदार गणपत गायकवाड यांच्यासह सात जणांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

कल्याण येथील द्वारली गावातील जमीन मालकाला जातीवाचक शब्द वापरल्याने आमदार गणपत गायकवाड यांच्यासह इतर सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Ganpat Gaikwad
Ajit Pawar: 'मीच उमेदवार आहे असं समजा...', बारामतीत अजित पवारांनी केली लोकसभेच्या लढतीची तयारी

कल्याण पूर्वेचे भाजपा आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यातील वाद आणि या वादातून घडलेली गोळीबारची घटना यामुळे राजकीय वातावरण पूर्ण ढवळून निघाले आहे. कल्याण पूर्वेतील अंबरनाथ तालुक्याच्या महसुली हद्दीत असलेल्या द्वारली गावात कुटुंबियांच्या जमिनीचा वाद सुरु होता. हा जमिनीचा वाद न्यायालयापर्यंत देखील गेला.

या प्रकरणाचा निकाल आमदार गायकवाड यांच्या बाजूने लागला होता. या नंतर आमदार गायकवाड यांनी संबंधित जमिनीला संरक्षण भिंत बांधायला सुरुवात केली होती. आमदार गणपत गायकवाड यांनी 31 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता जातीवाचक शिविगाळ केली, असा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. त्यामुळे त्यांच्यासह जितेंद्र पारीक, विठ्ठल चिकणकर, शिवाजी फुलोरे, सौरभ सिंग, छोटू खान, चंद्रकांत ओल, नगेश वारघेट यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. एकीकडे फायरिंग करून सध्या पोलीस कोठडीत असलेल्या आमदार गायकवाड यांच्यावर अन्य एका गुन्ह्याची भर पडली असल्याने त्यांच्या अडचणित आणखी भर पडली आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Ganpat Gaikwad
Anganwadi Centers : महाराष्‍ट्रात तब्बल 13 हजार अंगणवाड्यांना केंद्राची मान्यता; मंत्री स्मृती इराणी यांची माहिती

अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील नीता एकनाथ जाधव यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 31 जानेवारी रोजी गणपत गायकवाड आणि इतरांनी आमच्या जागेवर संरक्षण भिंतीचे करण्याचे काम सुरु केले. आम्ही त्यांना जाब विचारला तेव्हा आमदार गणपत गायकवाड यांनी आम्हास मारण्यासाठी फावड्याचा दांडका उचलला. त्यानंतर जातीवाचक शिवीगाळ केली. तुम्ही तुमच्या जमिनीकरीता कोणत्याही कोर्टामध्ये जा असं जाधव यांनी तक्रारीत म्हटलं आहे. त्यामुळे आता पुन्हा गायकवाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

शेतकऱ्यांकडून सुरक्षेची मागणी !

आमदार गायकवाड यांनी जाधव कुटुंबियांच्या जमिनीवरून महेश गायकवाड, राहुल पाटील आणि चैनु जाधव यांच्या दिशेने पोलीस ठाण्यात गोळीबार केला आहे. त्यामुळे जमीन मालकांनी देखील आमच्या जीवाला धोका असून आम्हाला शासनाने सुरक्षा दयावी असं माध्यमांसमोर म्हटलं आहे.

Ganpat Gaikwad
Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यात बॉम्ब असल्याच्या फोनमुळे खळबळ, मध्यरात्री ठाणे पोलिसांची पळापळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.