आपल्या मागण्या सरकारसमोर मांडण्यासाठी शेतकऱ्यांनी नाशिक ते मुंबई असा पायी मोर्चा काढला आहे. मुंबईत पोहोचल्यानंतर शेतकरी आपल्या विविध समस्यांसाठी आझाद मैदानात निदर्शने करणार आहेत. दरम्यान हा मोर्चा मुंबईत धडकण्याआधीच सरकारच्या दोन मंत्र्यांनी आज आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेतली. शिंदे सरकारचे मंत्री दादा भुसे आणि अतुल सावे यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली.
शिंदे सरकारमधील मंत्री दादा भुसे आणि मंत्री अतुल सावे हे मोर्चेकऱ्यांशी मध्यस्थी करण्यासाठी शहापुरात दाखल झाले होते. शहापुरच्या तहसील कार्यालयात दोन्ही मंत्र्यांनी आंदोलक शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. मात्र शेतकरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक लावण्यासाठी ठाम राहिले.
शेतकऱ्यांशी झालेल्या भेटीनंतर दादा भुसे यांनी माहिती देताना सांगितले की, आम्ही शेतकऱ्यांच्या 14 मुद्द्यांवर चर्चा केली. आम्ही अनेक मुद्द्यांना मान्यता आणि सहमती दर्शवली आहे... आम्ही सविस्तर चर्चा केली.
आम्ही सीपीआय आणि शेतकऱ्यांना मंत्रालयात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटण्याची विनंती करतो. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उद्या दुपारी 3 वाजता मंत्रालयात शेतकरी प्रतिनिधींची भेट घेणार आहेत असे मंत्री दादा भुसे यांनी सांगितले आहे.
कांद्याला रास्त भाव मिळावा यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रातील हजारो शेतकरी मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत. सरकार आणि शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळात बुधवारी होणारी बैठक रद्द करण्यात आली होती. राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी पायी चालणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेऊन चर्चा करावी, असे शेतकऱ्यांचे म्हणणे होते.
त्यानुसार आज मंत्री आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा झाली.आता उद्या शेतकरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतात का आणि या भेटीत काय तोडहा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.