‘महा-डीबीटी' ॲपद्वारे शेतकऱ्यांना मिळणार कृषी योजनांचा लाभ

घरबसल्या कागदपत्रं करा अपलोड
Maha-DBT
Maha-DBT
Updated on

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना कृषीविषयक सर्व सरकारी योजनांचा घरबसल्या लाभ घेता यावा, यासाठी कृषी विभागाच्यावतीने ‘महा-डीबीटी' (Maha-DBT) हे मोबाईल ॲप्लिकेशन कार्यान्वित करण्यात आले आहे. या ॲपमुळे शेतकऱ्यांना कृषी योजनांसाठी (Farm Schemes) मोबाईलवरूनच घरबसल्या अर्ज करता येणार आहे, राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी ही माहिती दिली.

Maha-DBT
१२७ वी घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत पूर्णबहुमतानं मंजूर

या ॲपमुळे योजनांसाठी आवश्‍यक सर्व कागदपत्रेसुद्धा आता ॲंड्रॉईड मोबाईलवरून अपलोड करता येणार आहेत. शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागाच्या या ॲपचा वापर करण्याचे आवाहन धीरजकुमार यांनी केले आहे. या ॲपचा वापर करण्यासाठी कृषी विभागाच्या https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. या संकेतस्थळावर गेल्यानंतर शेतकरी योजना या पर्यायावर जाऊन शेतकरी योजनांसाठी अर्जसुद्धा करता येणार आहे.

Maha-DBT
2019 मध्ये भाजपचा निवडणूक खर्च ४०० कोटींहून अधिक - EC

शेतकऱ्यांना केवळ एकाच अर्जाच्या माध्यमातून सर्व योजनांचा लाभ घेता यावा, या उद्देशाने हे ॲप्लिकेशन तयार केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना अर्ज करण्यापासून ते संबंधित योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. या नव्या प्रणालीमुळे शेतकरी त्यांच्या पसंतीच्या शेती योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत. शेतकऱ्यांची सोडतीद्वारे योजनानिहाय लाभासाठी निवड अंतिम केली जाते. निवड झालेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून पूर्वसंमती पत्र प्राप्त झाल्यानंतर कागदपत्रे छाननीकरिता पोर्टलवर अपलोड करावी लागतात. मात्र, सध्या कोरोनामुळे सामुदायिक सेवा केंद्रे आणि कृषी कार्यालयात जाऊन कागदपत्रे अपलोड करणे गैरसोईचे होत आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी हे ॲप तयार केले आहे.

Maha-DBT
'हायकोर्टाच्या निर्णयाचा अभ्यास करुन 11 वीची प्रवेश प्रक्रिया राबवणार'

याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ‘महाडिबीटी फार्मर’ हे ॲप डाऊनलोड करून घ्यावे. हे ॲप वापरकर्त्यांचं ओळखपत्र आणि आधार क्रमांकावर आधारित आहे. त्यामुळे गावातील अनेक लाभार्थी हे एकाच मोबाईलवरून ही कागदपत्रे अपलोड करु शकतात, असेही धीरजकुमार यांनी म्हटले आहे.

मदतीसाठी कृषी विभागाचा मदत कक्ष

या ॲपच्या माध्यमातून कागदपत्रे अपलोड करण्यास काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास, ती अडचण दूर करण्यासाठी जवळच्या सामुदायिक सेवा केंद्राची मदत घ्यावी. शिवाय कृषी विभागाच्यावतीने ही अडचण सोडवण्यासाठी स्वतंत्र मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. यामुळे तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी शेतकरी या कक्षाशी ई-मेल किंवा दूरध्वनीद्वारे संपर्क साधू शकतात. या कक्षाशी helpdeskdbtfarmer@gmail.com या ई-मेलवर किंवा (०२०) २५५११४७९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन कृषी आयुक्तांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.