कृषी विषयाचा समावेश शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल आज शिक्षण विभागाने स्वीकारला आहे. याबाबत तज्ज्ञांची समिती नेमून अभ्यासक्रमाचा आराखडा निश्चित केला जाणार असल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
यासंदर्भातील अहवाल आज सत्तार यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे सुपूर्द केला. कृषी केंद्रीत आशयामुळे शेतीचे अध्ययन होईल. शेतीकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढेल तसेच शेती व शेती व्यवसाय करणाऱ्यांबद्दल जाणीव व संवेदनशीलता निर्माण होईल, असा विश्वास सत्तार यांनी व्यक्त केला.
शालेय विद्यार्थ्यांना लहान वयातच शेतीबद्दलचं ज्ञान मिळालं तर पुढे त्यांना शेतीचं महत्त्व नक्कीच समजेल, असं कृषीमंत्री म्हणाले आहेत. तसंच या विषयाचा आराखडा तयार करताना पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी, नववी ते दहावी असे टप्पे आखण्यात येणार आहेत. लागेल ते साहित्य कृषी विभाग उपलब्ध करून येईल, असंही कृषीमंत्र्यांनी सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.