धक्कादायक ! येरमाळ्यात महिला भाविकेचा विनयभंग, महाराजाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कळंब तालुक्यातील श्री दत्त मंदिर तीर्थक्षेत्र मलकापूरमधील एकनाथ लोमटे या महाराजाने मागच्या वर्षी जुलै महिन्यात महिला भाविकाचा विनयभंग करुन मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याने त्याला अटक करण्यात आली होती.
Crime
CrimeSakal
Updated on

Yermala molestation Case: कळंब तालुक्यातील श्री दत्त मंदिर तीर्थक्षेत्र मलकापूरमधील एकनाथ लोमटे या महाराजाने मागच्या वर्षी जुलै महिन्यात महिला भाविकाचा विनयभंग करुन मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याने त्याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात महाराजाला न्यायालयाच्या आदेशाने पुन्हा अटक करण्यात आली आहे.

विनयभंग पिडीत भाविकेने अत्याचार झाल्या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करुन न्यायालयात दाद मागीतली होती. न्यायालयाच्या आदेशाने एकनाथ लोमटे या महाराजाला येरमाळा पोलिसांनी पंढरपूर येथुन अटक केली.

श्री दत्त मंदिर तीर्थक्षेत्र मलकापूर येथे दर्शनासाठी आलेल्या महिलेस खोलीमध्ये बोलवून घेत महिलेच्या शरीराला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली.

याबद्दल पोलिसांनी सविस्तर माहिती देत सांगितले की, भाविकांच्या समस्येवर उपाय करण्यासाठी परिचित असणाऱ्या या महाराजाने त्या दिवशी दर्शनासाठी आलेल्या ३५ वर्षीय महिलेला मठातील दर्शन मठातून आपल्या खोलीत बोलवले. त्यानंतर त्याने महिलेच्या अंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करु लागला.

महिलेने प्रतिक्रार केल्यावर त्याने तिला मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकीही दिली. हा घडलेला प्रकार जेव्हा मंदिरात समजला तेव्हा परिसरात प्रचंड गोंधळ उडाला, पण या महाराजाने सर्वांना शांत करत मंदिरातून पळ काढला.

Crime
स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री इर्शाळवाडीत! लोकांच्या रोजगाराचा सोडवणार प्रश्न, व्यवसायासाठी सरकार करणार आर्थिक मदत

त्याच रात्री महिलेने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला आणि त्या महाराजाविरुद्ध फिर्याद दिली. या महाराजाविरुद्ध कलम ३५४, ३५४ अ, ३४१, ३२३, ५०४ आणि ५०६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणात महाराजाला महिन्याभरात जामीन मंजूर करण्यात आला होता.(Latest marathi News)

प्रकरण न्यायप्रविष्ट असताना पिढीत महिला भाविकेने अत्त्याचार झाल्या प्रकरणी फौजादारी दाखल करून न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार एकनाथ लोमटे महाराजला पिडीत महिला भाविकेवर अत्याचार केल्या प्रकरणी पंढरपुर येथून अटक करण्यात आली आहे.

Crime
Indian Army Soldier Kidnapped: सुट्टीवर आलेला लष्करी जवान बेपत्ता, कारमध्ये आढळल्या रक्ताच्या खुणा नेमकं काय घडलं?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.