पोलिस भरतीची उद्यापासून मैदानी चाचणी! ‘या’ उमेदवारांना मैदानीसाठी मिळणार दुसरी तारीख; मैदानीत धावणे व गोळाफेक; सोलापुरात एसपींनी केली उमेदवारांच्या राहण्याची सोय

एकाच उमेदवाराने चार किंवा तीन पदांसाठी अर्ज केलेले आहेत. त्यांची एकाच दिवशी मैदानी चाचणी येत असल्यास त्यांनी विनंती अर्ज दिल्यास त्या उमेदवाराला पुढील तारीख दिली जाणार आहे. दोन मैदानी चाचणीत किमान चार दिवसांचे अंतर असणार आहे.
solapur
police bharatisakal news
Updated on

सोलापूर : पोलिस भरतीसाठी बुधवारपासून (ता. १९) मैदानी चाचणीला सुरवात होणार आहे. पहिल्या दिवशी पहाटे पाच ते साडेपाच वाजल्यापासून मैदानी चाचणी सुरू होईल. पहिल्या दिवशी ५०० उमेदवारांना बोलावले जाणार असून त्यानंतर दररोज ७५० उमेदवारांची मैदानी चाचणी होईल. शहर व ग्रामीण पोलिसांच्या मुख्यालयाच्या मैदानावर ही चाचणी होणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी दिली.

सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील ८५ पोलिस शिपाई व नऊ चालकांच्या जागांसाठी भरती होत आहे. तर शहरातील ३४ पोलिस शिपाई व १६ चालक पदांसाठी ही परीक्षा होत आहे. भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक होणार असून मैदानावर सीसीटीव्ही लावले जाणार आहेत. याशिवाय प्रत्येक प्रकाराचे व्हिडिओ शुटिंग देखील केले जाणार आहे. ग्रामीण पोलिस दलातील पोलिस शिपाई पदांसाठी तीन हजार ३५९ पुरूष तर ९३७ महिला उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्याशिवाय ५६ माजी सैनिक व एक तृतीयपंथी उमेदवाराचा देखील अर्ज आहे.

तसेच चालक पदासाठी ६५९ पुरूष, ४० महिला व ११ माजी सैनिकांचे अर्ज प्राप्त झाल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले. शहर पोलिसांतर्फे उमेदवारांची मैदानी चाचणी १९ ते २१ जूनपर्यंत घेतली जाणार आहे. तर ग्रामीण पोलिसांतर्फे १९ ते २६ जूनपर्यंत मैदानी चाचणी घेतली जाईल. पावसामुळे काही व्यत्यय आल्यास २९ व २९ जून हे दोन दिवस राखीव ठेवण्यात आले आहेत.

‘या’ उमेदवारांना नवी तारीख

सध्या राज्यात २०२२-२३ या आर्थिक वर्षातील पोलिस भरतीला सुरवात होत आहे. पोलिसांच्या १७,४७१ पदभरतीत बॅंड्‌समन, कारागृह शिपाई, पोलिस शिपाई व पोलिस चालकांची पदे आहेत. त्यासाठी राज्यभरातून तब्बल १७ लाख ७६ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. एकाच उमेदवाराने चार किंवा तीन पदांसाठी अर्ज केलेले आहेत. त्यांची एकाच दिवशी मैदानी चाचणी येत असल्यास त्यांनी विनंती अर्ज दिल्यास त्या उमेदवाराला पुढील तारीख दिली जाणार आहे. दोन मैदानी चाचणीत किमान चार दिवसांचे अंतर असणार आहे. पण, दुसऱ्या ठिकाणी मैदानी चाचणी देताना पूर्वीच्या मैदानी चाचणीला उपस्थित असल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे.

मैदानी चाचणीत धावणे व गोळाफेक

  • पुरुष उमेदवार : १६०० मीटर व १०० मीटर धावणे आणि गोळाफेक

  • महिला उमेदवार : ८०० मीटर व १०० मीटर धावणे, गोळाफेक

  • चालक शिपाई : १६०० मीटर (पुरुष उमेदवार) धावणे आणि ८०० मीटर (महिला उमेदवार) धावणे व वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी

अचिव्हर्स हॉलमध्ये उमेदवारांच्या राहण्याची सोय

विविध जिल्ह्यातून किंवा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून भरतीसाठी आलेल्या तरुण- तरुणींना इतरत्र कोठेही राहावे लागते. या पार्श्वभूमीवर आता अशा उमेदवारांची सोय ग्रामीण पोलिसांच्या पेट्रोल पंपासमोरील अचिव्हर्स हॉलमध्ये करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.