शाळा-कॉलेज सुरु करण्याबाबत उद्यापर्यंत अंतिम निर्णय - राजेश टोपे

शाळा-कॉलेज सुरु करण्यास टास्क फोर्सचा विरोध
school
school sakal media
Updated on

मुंबई : कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून अस्तित्वात असलेल्या लहान मुलांबाबतच्या टास्कफोर्सनं शाळा-कॉलेजस सुरु करण्यास एकत्रितरित्या विरोध दर्शवला आहे. यापार्श्वभूमीवर टास्कफोर्स आणि शालेय शिक्षण विभागाची संध्याकाळी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीत शाळा-कॉलेज सुरु करावेत की नाही याबाबत आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत अंतिम आदेश जाहीर होतील, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.

school
कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना १ टक्का आरक्षण; राज्य सरकारची घोषणा

टोपे म्हणाले, याबाबत मुख्यमंत्री, आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागाची बैठक होईल. त्यानंतर कॉलेजेस आणि विद्यापीठे सुरु करण्याबाबत विद्यापीठांचे कुलगुरु आणि तिथल्या जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांशी बोलणी करुन दोन-चार दिवसात त्यांच्याकडून अहवाल मागवण्यात येईल.

school
Unlock : हॉटेल्स, रेस्तराँ आणि मॉल्स रात्री 10 वाजेपर्यंत राहणार सुरु

दरम्यान, अठरा वर्षांखालील मुलांना आपण अद्याप लस दिलेल्या नाहीत, त्यामुळं त्यांना मोठा धोका असल्याचं टास्कफोर्सचं म्हणणं आहे. कारण इतर राज्यांमध्ये लहान मुलांच्या संसर्गवाढीच्या घटना समोर आल्या आहेत. म्हणून याबाबत धोका पत्करायला टास्कफोर्स तयार नाही. त्यामुळे याबाबतच आज बैठक होईल त्यानंतर त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असंही यावेळी आरोग्य मंत्री टोपे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.