Opposition Leader: अखेर काँग्रेसचा विरोधी पक्षनेता ठरला! या नेत्याच्या गळ्यात पडली विरोधी पक्षनेत्याची माळ

काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील नेत्याला मिळाले विरोधीपक्षनेतेपद
Opposition Leader
Opposition LeaderEsakal
Updated on

महाराष्ट्रातील विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद सुमारे चार वर्षांनंतर काँग्रेसकडे चालून आले आहे. या पदासाठी कोणत्याही परिस्थितीत भाजपकडे न जाणाऱ्या नेत्याच्या शोधात पक्षश्रेष्ठी होते. पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे तीन नेत्यांची नावे चर्चेत असताना विजय वड्डेटीवार यांच्या नावाची घोषणा आज करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता पद काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांना मिळाल्याची माहीती समोर आली आहे.

Opposition Leader
PM Modi Pune Visit: पंतप्रधानांची तिसरी पुणेवारी! या ३ कारणांमुळे मोदींचा दौरा ठरणार भाजपसाठी मास्टरस्ट्रोक

महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता पद काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांना देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. विधीमंडळ पक्षनेते पदाची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्याकडेच राहणार आहे. बाळासाहेब थोरात यांना हा निर्णय दिल्ली हायकंमाडने कळवला आहे. त्याचबरोबर आता महाराष्ट्राच्या विधानसभा विरोधी पक्षनेते पदी विजय वड्डेटीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक दिवसांच्या चर्चेनंतर पक्षाने हा निर्णय घेतला आहे.

Opposition Leader
Samruddhi Accident: गर्डर अपघातातील मृतांना, जखमींना नुकसान भरपाई जाहीर

अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर नवा विरोधी पक्षनेता कोण असेल असा प्रश्न निर्माण झाला होता. जास्त संख्याबळाच्या जोरावर काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगितला होता. त्यानुसार आज विरोधी पक्षनेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली आहेत.

Opposition Leader
Marathi News Update: नरेंद्र मोदींचा पुणे दौरा ते दिल्ली विधेयकावर लोकसभेत उद्या चर्चा

काँग्रेसमधील दुसऱ्या फळीतील नेत्याकडे ही जबाबदारी मिळण्याची शक्यता याआधी वर्तवण्यात आली होती. विरोधी विरोधी पक्षनेते पदासाठी चार नावांची जोरदार चर्चा होती. यामध्ये सुनील केदार, विजय वड्डेटीवार, यशोमती ठाकूर, संग्राम थोपटे  यांच्या नावाची काँग्रेसमध्ये जोरदार चर्चा होती. त्यानुसार आज विजय वड्डेटीवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर बाळासाहेब थोरात काँग्रेस गटनेते राहणार आहेत त्यामध्ये कोणताही बदल नाही, अशी माहीती आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()