Ajit Pawar News : अर्थमंत्री होताच अजित पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये! राष्ट्रवादीच्या आमदारांना भरघोस निधी

NCP Ajit Pawar News
NCP Ajit Pawar Newssakal
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात भुकंप झाला. यानंतर शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवारांना अर्थखात्याची जबाबदारी देखील देण्यात आली. यानंतर अजित पवार यांनी कार्यकाळाच्या सुरूवातीलाच राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांवर विकास निधीचा वर्षाव केला आहे.

अजित पवारांच्या प्रत्येक आमदाराला विकासकामांसाठी भरभरुन निधी मिळाला आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी आमदारांना विकासकामांसाठी तब्बल 25 कोटीहुन अधिक निधी दिला आहे. अर्थ खात्याची सूत्रे अजित पवारांच्या हाती येताच आठवडाभरातच राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांवर निधीचा वर्षाव करण्यात आला आहे. या आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी प्रत्येकी २५ कोटी किंवा त्याहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीसाठी पुरवणी मागण्यांमध्ये खास तरतूद करण्यात आली आहे.

NCP Ajit Pawar News
Mumbai Water Supply Lakes Level : दिलासादायक बातमी! पाणी कपात लवकरच रद्द होणार; ७ तलावांमध्ये 'इतका' पाणीसाठी

विधिमंडळाला सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघांतील विकास कामांसाठी १५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अजित पवारांना साथ देण्याच्या निर्णयामुळे आपल्या मतदारसंघातील रखडलेल्या विकास कामांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर झाल्याचे आमदार सरोज अहिरे यांनी समाजमाध्यमातून जाहीर केलं आहे.

NCP Ajit Pawar News
Gujarat Floods : गुजरातमध्ये मुसळधार पावसाचे थैमान! जुनागडसह इतर भागात पूर; अनेक वाहने गेली वाहून

शिंदे गटाचं काय?

माहाविकास आघाडी सरकारच्या काळात अजित पवार हे शिवसेनेच्या आमदारांना निधी मिळू देत नव्हते असा आरोप करत महाविकास आघाडीतून बाहेर पडलेलल्या शिंदे गटातील आमदारांना देखील खूष करण्यात आले आहे. नाराजी टाळण्यासाठी दीड हजार कोटींच्या तरतुदीतून राष्ट्रवादीबरोबरच शिंदे गटाच्या काही आमदारांच्या मतदारसंघांतील विकास कामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.