मुख्यमंत्र्यांना दरमहा 'एवढा' पगार! जाणून घ्या मंत्री, आमदारांचे वेतन

मुख्यमंत्र्यांना दरमहा मिळतो 'एवढा' पगार ! जाणून घ्या मंत्री, राज्यमंत्री, आमदारांचे वेतन
मुख्यमंत्र्यांना दरमहा मिळतो 'एवढा' पगार ! जाणून घ्या मंत्री, राज्यमंत्री, आमदारांचे वेतन
मुख्यमंत्र्यांना दरमहा मिळतो 'एवढा' पगार ! जाणून घ्या मंत्री, राज्यमंत्री, आमदारांचे वेतनSakal
Updated on
Summary

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री, आमदार, माजी आमदारांना राज्याच्या तिजोरीतून वेतन व पेन्शन दिली जाते.

सोलापूर : राज्याचे दरवर्षीचे उत्पन्न सरासरी सव्वातीन लाख कोटींचे असून, त्यातील एक लाख 54 हजार कोटींचा खर्च शासकीय कर्मचाऱ्यांवरच होतो. दुसरीकडे मुख्यमंत्री (Chief Minister), उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister), मंत्री (Minister), राज्यमंत्री, आमदार, माजी आमदारांनाही राज्याच्या तिजोरीतूनच वेतन, पेन्शन दिले जाते. आजी-माजी लोकप्रतिनिधींना दरवर्षी 181 कोटी रुपये वेतन व पेन्शनपोटी दिले जातात, अशी माहिती विधान भवन (Vidhan Bhavan) व सामान्य प्रशासनातील विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

मुख्यमंत्र्यांना दरमहा मिळतो 'एवढा' पगार ! जाणून घ्या मंत्री, राज्यमंत्री, आमदारांचे वेतन
EPF व्याज : मोदी सरकार 6 कोटींहून अधिक लाभार्थींना देणार दिवाळी भेट

महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात 31 कॅबिनेट मंत्री असून दहा राज्यमंत्री आहेत. दुसरीकडे, विधानसभेचे 288 आमदार तर विधान परिषदेचे 78 आमदार आहेत. सध्या विधान परिषदेच्या काही आमदारांच्या जागा भरलेल्या नाहीत. तर राज्यातील 813 माजी आमदारांना दरमहा पेन्शन दिली जाते. 2016 मध्ये लोकप्रतिनिधींच्या वेतनात भरघोस वाढ करण्यात आली आहे. कोरोना काळात राज्याच्या तिजोरीत अपेक्षित महसूल जमा होत नव्हता. तरीही, आजी-माजी लोकप्रतिनिधींना वेतन दिले, असेही सूत्रांनी सांगितले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांना स्वतंत्रपणे वैद्यकीय खर्चासह प्रवास खर्चही दिला जातो. विशेष बाब म्हणजे, आमदार झालेला लोकप्रतिनिधी मंत्रिमंडळात गेल्यानंतर त्यांना आमदाराचे नव्हे तर मंत्र्याचे वेतन मिळते. आमदारांना दरमहा दोन लाख 40 हजार 973 रुपयांचे वेतन मिळते. त्यातून टॅक्‍स कपात केली जाते, असेही सांगण्यात आले. लोकसेवा करताना आजी-माजी लोकप्रतिनिधींना आर्थिक चणचण भासणार नाही, यादृष्टीने वेतन व पेन्शनचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या तिजोरीतून त्यांना दरमहा वेतन दिले जाते. दरम्यान, आता प्रत्येक आमदाराला पगारी वाहनचालक देण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचेही सांगण्यात आले.

पेन्शन व वेतनावरील दरवर्षीचा खर्च...

  • माजी आमदार : 60 कोटी

  • आमदारांचे वेतन : 106 कोटी

  • मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री : 10.94 कोटी

  • राज्यमंत्री : 3.15 कोटी

मुख्यमंत्र्यांना दरमहा मिळतो 'एवढा' पगार ! जाणून घ्या मंत्री, राज्यमंत्री, आमदारांचे वेतन
'राज्य शासनाला शेतकऱ्यांच्या समस्यांपेक्षा शाहरुखच्या मुलाची चिंता!'

ठळक बाबी...

  • राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दरमहा मिळते 2.85 लाखांचे वेतन

  • उपमुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्र्यांना दिली जाते दरमहा 2.85 हजारांचेच वेतन

  • मंत्रिमंडळातील राज्यमंत्र्यांना दरमहा आहे 2.63 लाखांचे वेतन

  • वेतनाशिवाय मंत्र्यांना वैद्यकीय खर्च, प्रवास खर्चही तिजोरीतून दिला जातो

  • राज्यातील जवळपास 813 माजी आमदारांना दिली जाते दरमहा प्रत्येकी 50 हजारांची पेन्शन

  • आमदारांना दरमहा दोन लाख 40 हजार 973 रुपयांचे (टॅक्‍स वगळून) मिळते वेतन

  • काही मंत्र्यांनी नियुक्‍त केलेल्या सल्लागारांनाही तिजोरीतूनच दिले जाते वेतन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.