मुंबई- राज्य शासनाने ग्रामीण भागातील झाडांबाबत कडक नियम लागू केला आहे. आता झाडाची छाटणी केली किंवा साल काढल्यास ५० हजार रुपयांचा दंड आहे. राज्यात लागू असलेल्या वृक्षतोड नियंत्रण कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे.
वृक्षतोडीला पूर्वी केवळ एक हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा होती. १९६४ पासून या दंडात कोणतीही वाढ केली गेली नव्हती. किरकोळ दंड होत असल्यामुळे वृक्षतोडीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अर्थात, या कायद्यातून नागरी क्षेत्रे वगळण्यात आली आहेत.