अकोल्यात कालीचरण महाराजांवर गुन्हा दाखल, गांधीजींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य

Kalicharan Maharaj
Kalicharan Maharajgoogle
Updated on

अकोला : छत्तीसगडमधील रायपूर येथे एका धार्मिक (Chhatisgarh Dharm Sansad) कार्यक्रमात कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी (Kalicharan Offensive Statement Against Mahatma Gandhi) यांच्या विरोधात अपशब्द वापरले. याप्रकरणात सिटी कोतवाली पोलिस स्टेशन (City Kotwali Police Station Akola) येथे ठिय्या आंदोलन करून गुन्हे दाखल करण्याची मागणी काँग्रेसच्या वतीने सोमवारी करण्यात आली होती. त्यानंतर अखेर कालीचरण महाराजावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Kalicharan Maharaj
गांधीजींविरोधात धार्मिक नेत्याचं आक्षेपार्ह विधान, राऊतांचा मोदींवर हल्लाबोल

छत्तीसगडमधील रायपूर येथे धर्म संसद या धार्मिक कार्यक्रमात कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्या विरोधात अपशब्द वापरले असून त्यांच्या मारेकऱ्याचे समर्थन केले आहे. या घटनेचे सर्वस्तरातून पडसाद उमटत असून कालीचरण महाराज यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा यासाठी जिल्हाधिकारी यांना सोमवारी निवेदन देण्यात आले होते. यानंतर काँग्रेस नेत्यांनी कालीचरण महाराजांविरोधात तक्रार करण्यासाठी सिटी कोतवाली पोलीस ठाणे गाठले. या ठिकाणी ठिय्या आंदोलन करून कालीचरण महाराज यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सुद्धा करण्यात आली होती. सदर ठिय्या आंदोलन रात्री उशिरापर्यंत सुरू राहीले. त्यामुळे शेवटी सिटी कोतवाली पोलिसांनी कालीचरण महाराज यांच्याविरुद्ध कलम २९४, ५०५ अंतर्गत गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचं ठिय्या आंदोलन
गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचं ठिय्या आंदोलनe sakal

कालीचरण महाराजांनी महात्मा गांधीविरोधात आक्षेपार्ह विधान केलं होतं. तसेच गांधींना मारणाऱ्या नथुराम गोडसेला नमस्कार, असं कालीचरण आपल्या भाषण म्हणाले होते. त्यानंतर त्यांचे पडसाद महाराष्ट्र विधानसभेत देखील उमटले. यावेळी विजय वडेट्टीवार, नाना पटोले, नवाब मलिक या मंत्र्यांनी कालीचरण महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर याबाबत अधिक माहिती घेऊन कारवाई करणार असल्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.