IAS अधिकाऱ्यांची पहिलीच आषाढी वारी, तरी एक नंबर नियोजन! जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, झेडपी सीईओ मनीषा आव्हाळे व पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांचे कौतूक

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आव्हाळे यांची पहिलीच आषाढी वारी असतानाही त्यांनी वारकऱ्यांची गैरसोय होवू नये म्हणून अगदी बारीकसारीक गोष्टींचे सुक्ष्म नियोजन केले आहे. तर पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे हेही पंढरीत ठाण मांडून असून वारकऱ्यांच्या दिंडीचे अपघात होणार नाहीत, त्यांना सुरक्षितपणे येता यावे यादृष्टीने पोलिसांनी ठोस नियोजन केले.
pandharpur aasjadhi vari
pandharpur aasjadhi varisakal
Updated on

सोलापूर : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आव्हाळे यांची पहिलीच आषाढी वारी असतानाही त्यांनी वारकऱ्यांची गैरसोय होवू नये म्हणून अगदी बारीकसारीक गोष्टींचे सुक्ष्म नियोजन केले आहे. तर पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे हेही पंढरीत ठाण मांडून असून वारकऱ्यांच्या दिंडीचे अपघात होणार नाहीत, त्यांना सुरक्षितपणे येता यावे यादृष्टीने पोलिसांनी ठोस नियोजन केले. पंढरीत वारकऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत त्यांनीही अगदी चोख बंदोबस्त नेमला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्रिमंडळातील इतर सहकाऱ्यांसमवेत रविवारी (ता. १४) पंढरीत येवून नियोजनाची पाहणी केली. त्यांनीही अधिकाऱ्यांचे कौतूक केले.

कोसो दूर अंतरावर पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सर्व सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्यासह सर्वच प्रशासकीय अधिकारी पंढरीत मुक्कामीच आहेत. हे वरिष्ठ अधिकारी वारकऱ्यांसमवेत देखील बरेच पाऊल चालले, त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणीही त्यांनी जाणून घेतल्या. रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत याचीही त्यांनी खबरदारी घेतली आहे. वारकऱ्यांच्या मुक्कामाची चोख व्यवस्था, शौचालयांची व्यवस्था, अन्न-औषध प्रशासनाच्या माध्यमातून खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानांसह हॉटेल, ढाब्यांची तपासणी केली जात आहे. यंदाच्या वारीला १२ ते १५ लाख भाविक पंढरीत दाखल होतील, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला असून त्यादृष्टीने १२ हजार पोलिसांचा बंदोबस्त नेमण्यात आला आहे. पंढरपूर, गुरसाळे बंधाऱ्यातून वारीच्या निमित्ताने चंद्रभागा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. गतवर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारीपूर्वी पंढरीचा दौरा करीत सुविधांमध्ये हलगर्जीपणा केल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर ‘हार्ड ॲक्शन’ घेऊ का, असा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर यंदा वरिष्ठ अधिकारी पंढरीतच ठाण मांडून आहेत. जिल्ह्यात मानाच्या पालख्यांचे आगमन होण्यापूर्वी प्रशासनाने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. आता दिंड्या पंढरीच्या दिशेने येत असून १७ जुलैला आषाढीचा सोहळा रंगणार आहे. प्रशासनाने वारी मार्गावर उपलब्ध करून दिलेल्या सुविधा पाहून वारकरी देखील सुखावले असून त्यांच्या प्रतिक्रिया बोलक्या आहेत.

वारकऱ्यांसाठी ‘या’ मोफत सुविधा

आषाढी वारीच्या निमित्ताने पालख्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी मोफत मसाज केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. मोफत चप्पल दुरुस्ती, वारकऱ्यांसाठी कपडे इस्त्रीची व्यवस्था, दाढी, कटिंग, पालखी तळावर विद्युत रोषणाई, आकाश कंदिलाची व्यवस्था करण्यात आली आहे. यंदा आषाढीत स्वच्छता व वारकऱ्यांच्या आरोग्यावर फोकस करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सुविधांवर वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

झेडपीच्या ग्रामपंचायत विभागाच्या सुविधा

  • एकूण स्नानगृहे : १०००

  • कपडे बदलण्याच्या खोल्या : ८२

  • वॉटर प्रूफ मंडप : ५०

  • स्वच्छता स्वयंसेवक : ३००

  • सफाई कर्मचारी : २६७

  • ग्रामपंचायत मनुष्यबळ : ८१३

  • आपत्ती व्यवस्थापन केंद्रे : ३७

स्वच्छता विभाग सुविधा

  • तात्पुरते शौचालये : ३,९२५

  • जेटींग मशिन : ३४

  • सक्शन मशिन : ३४

  • घंटागाडी : २७१

  • स्वच्छता स्वयंसेवक : ३००

  • मदत केंद्रे : १४१

  • प्लास्टिक संकलन केंद्रे : १४३

ग्रामीण पाणीपुरवठा विभाग

  • पाण्याचे टॅंकर : २९९

  • सुरक्षित पाणी स्रोत : ३१८ विहिरी, ३७७ बोअर

  • पाणी भरण्याची ठिकाणे : १०८

  • टॅंकर भरल्यानंतर ओटी टेस्ट : २९९

महिला व बालकल्याण विभागाच्या सुविधा

  • हिरकणी कक्ष : ९१

  • सॅनिटरी नॅपकिन : ५०,०००

  • मुख्यमंत्री लाडकी बहीण माहिती कक्ष : ९१

  • रुग्णवाहिका : ५८

  • हॉटेल कामगार वैद्यकीय तपासणी : १,५३९

  • मुक्कामाच्या ठिकाणी उपचार केंद्रे : १४३

  • मेडिकल कीट : ४,५००

  • मनुष्यबळ : २,५२९

वारकऱ्यांची सेवा करण्याचा आनंद खूपच संस्मरणीय

जाता पंढरीशी होई पुण्यवंत! सेवा तयांची करिता भेटतो भगवंत!! या उक्तीप्रमाणे यंदाच्या आषाढीवारीत जिल्हा परिषदेचे सगळे अधिकारी, कर्मचारी पालखीतळ, विसावा, पालखी मुक्कामाच्या ठिकाणी राबत आहेत. त्यांच्याकडून वारकऱ्यांसाठी सुक्ष्म नियोजन केले जात आहे. भाविकांनी जिल्हा परिषदेच्या सोयी-सुविधांवर समाधान व्यक्त केले आहे.

- मनीषा आव्हाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.