Ajit Pawar: पहिल्याच कॅबिनेटमध्ये मिठाचा खडा! शिंदेंच्या आमदारांमध्ये नाराजीचा सूर

अजितदादांच्या सहभागानंतर सरकारमध्ये धुसफूस सुरु झाली आहे.
Eknath Shinde Ajit Pawar
Eknath Shinde Ajit PawarSakal
Updated on

मुंबई : अजितदादांच्या सहभागानंतर युती सरकारच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीत खटके उडायला सुरुवात झाली आहे. रायगडच्या कर्जतचे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पालकमंत्री म्हणून आदिती तटकरे यांना स्विकारणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. (First cabinet after Ajit Pawar enters in govt displeasure among Eknath Shinde MLAss)

Eknath Shinde Ajit Pawar
Sanjay Sirsath: "न्याय दिल्याशिवाय जमणार नाही"; अजितदादांच्या एन्ट्रीनंतर शिरसाटांचा थेट इशारा

आमची भूमिका आता हीच आहे की, सुरुवातीला प्रचंड प्रमाणात मतभेद होते. आता एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास दाखवून रायगडचे आम्ही तिन्ही आमदार त्यांच्यासोबत काम करत आहोत. आता ज्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत, त्यानंतर आम्ही सर्व आमदार जरी संभ्रमात असलो तरी मुख्यंमत्री शिंदे यावर मार्ग नक्कीच काढतील. (Latest Marathi News)

Eknath Shinde Ajit Pawar
Ajit Pawar Vs Sharad Pawar: दोन पवारांची वर्चस्वाची लढाई, महत्वाची भूमिका बजावणार कोण विधानसभा अध्यक्ष की सुप्रिम कोर्ट?

आत्ता ज्या घडामोडी घडत आहेत त्या पक्षहितासाठी फायदेशीरच असतील असं मला वाटतं. पण रायगडचे पालकमंत्री म्हणून आम्ही आदिती तटकरे यांचा स्विकार करणार नाही, हे स्पष्टपणे सांगतो, अशा शब्दांत आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीला इशारा दिला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.