UBT First List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; पुन्हा कोणाला मिळाली संधी? पाहा 17 उमेदवारांची नावे

First list of Thackeray group : ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये १७ उमेदवारांची नावे आहेत.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray
Updated on

मुंबई- ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये १७ उमेदवारांची नावे आहेत. औरंगाबादमधून चंद्रकांत खैरे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. सांगलीतून चंद्रहार पाटील यांना संधी देण्यात आली आहे. रायगडमधून अनंत गीते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परभणीमधून संजय जाधव यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. (First list of Thackeray group announced lok sabha election)

उबाठा गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी यादी तयार असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार आज सकाळी नऊ वाजता उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. ते म्हणालेत की, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे.

Uddhav Thackeray
Lok Sabha Poll 2024 : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा

वाचा उमेदवारांची संपूर्ण यादी

मतदारसंघ-- उमेदवाराचे नाव

बुलढाणा- नरेंद्र खेडेकर

यवतमाळ-वाशिम- संजय देशमुख

मावळ- संजोग वाघेरे-पाटील

सांगली- चंद्रहार पाटील

हिंगोली- नागेश पाटील आष्टीकर

संभाजीनगर- चंद्रकांत खैरे

धाराशिव- ओमराजे निंबाळकर

शिर्डी- भाऊसाहेब वाघचौरे

नाशिक- राजाभाऊ वाजे

रायगड- अनंत गीते

सिंधुदुर्ग-रत्नागिरी- विनायक राऊत

ठाणे- राजन विचारे

मुंबई-ईशान्य- संजय दिना पाटील

मुंबई-दक्षिण- अरविंद सावंत

मुंबई वायव्य- अमोल कीर्तीकर

परभणी- संजय जाधव

Uddhav Thackeray
Loksabha Election 2024 : शिरूरला आढळराव पाटील राष्ट्रवादीचे उमेदवार ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात विनायक राऊत यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवण्यात आला आहे. सांगलीच्या जागेवरुन महाविकास आघाडीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या जागेवर काँग्रेसने दावा केला होता. पण, ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांचे नाव निश्चित केले आहे. त्यामुळे स्थानिक काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी असणार आहे.

औरंगाबादच्या जागेसाठी चंद्रकांत खैरे यांनाच पुन्हा संधी मिळण्याची शक्यता होती. पण, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील या जागेसाठी इच्छा दर्शवली होती. मुंबईच्या एका जागेसाठी काँग्रेसचे संजय निरुपम आग्रही होते. पण, आता ठाकरे गटाने उमेदवार दिला असल्याने निरुपम यांच्यामध्ये नाराजी निर्माण झाली आहे. ते आज पत्रकार परिषद घेतील असं कळतंय. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.