आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी महत्त्वाची बातमी; साताऱ्यात 'सेफ हाउस'ची निर्मिती, काय आहे खासियत?

गेली अनेक वर्षे महाराष्ट्र ‘अंनिस’ आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांना पाठबळ देत आहे.
Inter Caste Marriage
Inter Caste Marriageesakal
Updated on
Summary

लोकांनी टोकाची भूमिका घेतल्यामुळे अनेक जोडप्यांना सुरुवातीच्या कालखंडात त्यांच्या गावी लगेच जाता येत नाही.

सातारा : आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह (Inter Caste Marriage) करणाऱ्या जोडप्यांना लग्नानंतर सुरुवातीच्या कालखंडात सुरक्षित निवारा देणारे राज्यातील पहिले मोफत ‘सेफ हाउस’ सातारा (Safe House Satara) जिल्ह्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे (Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti) सुरू करण्यात आले आहे.

गेली अनेक वर्षे महाराष्ट्र ‘अंनिस’ आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांना पाठबळ देत आहे. घरातल्या लोकांनी टोकाची भूमिका घेतल्यामुळे अनेक जोडप्यांना सुरुवातीच्या कालखंडात त्यांच्या गावी लगेच जाता येत नाही. तसेच कुटुंबीय आणि समाजाकडून मारहाणीचा तसेच जिवाचादेखील धोका उद्‍भवू शकतो. अशा परिस्थितीत त्या जोडप्याला सुरक्षित निवारा देणाऱ्या केंद्राची गरज असते.

Inter Caste Marriage
Gopichand Padalkar : आमदार गोपीचंद पडळकरांच्या जिभेवर सरस्वती आहे; असं का म्हणाले भाजप नेते?

पंजाब, हरियानामध्ये राज्य सरकारच्या मदतीने अशी ‘सेफ हाउस’ चालवली जातात. याच स्वरूपाचे पहिले ‘सेफ हाउस’ सातारा जिल्ह्यात सुरू करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र अंनिसमार्फत डॉ. हमीद दाभोलकर (Dr. Hamid Dabholkar) आणि शंकर कणसे यांनी दिली.

Inter Caste Marriage
ZP च्या 14 शाळेचे बनावट शिक्के वापरून जातीचे काढले दाखले; तहसीलदारांच्या पडताळणीतून धक्कादायक बाब उघड

असे आहेत ‘सर्वोच्च’ आदेश

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जानेवारी महिन्यात राज्य सरकारच्या गृह विभागाने आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांना संरक्षण देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक समिती स्थापन करावी, असे आदेश दिले आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या समितीमार्फत त्यांच्याकडे मदत मागणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा पुरवण्यात यावी, असे त्यात म्हटले आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात अशा जोडप्यांना सुरक्षा निवारा केंद्र उपलब्ध करून द्यावे, असेही त्यात बंधनकारक आहे.

‘जात’ हीसुद्धा अंधश्रद्धा

जात ही एक कुठलाही वैधानिक आधार नसलेली अंधश्रद्धा आहे, या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या भूमिकेला अनुसरून हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. आंतरजातीय, आंतरधर्मीय लग्न केलेल्या जोडप्यांना मदत मिळावी म्हणून ‘अंनिस’मार्फत एक आधार गटही सुरू करण्यात आला आहे, असे डॉ. हमीद दाभोलकर यांनी सांगितले.

Inter Caste Marriage
मोदींच्या राज्यात चाललंय काय? वरातीत घोड्यावर बसला म्हणून दलित नवरदेवाला जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण

महाराष्ट्र ‘अंनिस’चे कार्यकर्ते शंकर कणसे यांच्या जागेत त्यांनी स्वतःहून खर्च करून हा सुरक्षा निवारा बांधला आहे आणि महाराष्ट्र ‘अंनिस’ आणि ‘स्नेह आधार संस्थे’मार्फत हा उपक्रम चालवला जाणार आहे.

- डॉ. हमीद दाभोलकर

येथे करा संपर्क

आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह साह्यता केंद्राची मदत हवी असल्यास महाराष्ट्र ‘अंनिस’मार्फत ९९२२३५५४३५ ही मोफत हेल्पलाइनही उपलब्ध आहे, असे डॉ. दाभोलकर यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.