18 वर्ष पूर्ण झाली असतील तर आजच मतदान ओळखपत्र काढा, त्यासाठीच्या दोन सोप्प्या पद्धती....
लोकशाहीमध्ये लोकांच्या मतांनेच सरकार तयार होते. आपलं सरकार निवडण्याचं आधिकार प्रत्येक भारतीयांना आहे. यासाठीही एक पात्रता आणि नियम तयार करण्यात आलेले आहेत. मतदान प्रक्रियेतून सरकार निवडण्याचा आधिकार भारतीयांना मिळाला आहे. पात्रतेसाठी मतदार हा फक्त नागरिक असणे पुरेसे नाही. तर त्याचे नांव मतदार यादीत असावे लागते व आता नव्या तरतूदीप्रमाणे निवडणूक आयोगाने दिलेले ओळखपत्रही लागते. यासाठी 18 वर्ष पूर्ण असावे लागतात. घटनेच्या कलम 326 प्रमाणे अर्हतादिनी 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या भारतीय नागरिकांना मतदानाचा हक्क आहे आणि त्यांची नावे मतदार घेण्यासाठी ते पात्र आहेत. धर्म, जात, लिंग, यावरून भेद करून कोणाही नागरिकाला या हक्कापासून वंचित करता येत नाही. जर तुम्ही वयाची 18 वर्ष पूर्ण केली असतील आणि तुमच्याकडे मतदान ओळखपत्र नसेल तर ते बनवून घ्यायला हवे. पाहूयात यासाठीची प्रक्रिया जाणून घेऊयात....
ऑफलाइन कसा कराल अर्ज -
प्रत्येक्षात जाऊन मतदान ओळखपत्र काढण्यासाठी फॉर्म 6 भरावा लागेल. हा फॉर्म निवडणूक आयोगाच्या कार्यलयातून किंवा तुमच्या जवळील सरकारी कार्यालयात मिळेल. फॉर्म 6 या अर्जावरील सर्व माहिती भरुन कादगतपत्राची पूर्तता करावी. त्यानंतर हा अर्ज जवळील तहसील कार्यालयात पाठवा.
ऑनलाइन प्रक्रिया -
राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल (NVSP) https://www.nvsp.in/ या संकेतस्थळावर जावे. 'नवीन मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करा' यावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज येईल, ज्यामध्ये आपल्याला नाव, पत्ता, जन्मतारीख भरावी लागेल. ही सर्व माहिती भरा. अन् आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. सर्व प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण केल्यावर सबमिटवर क्लिक करा. आपण नोंदवलेल्या मेल आयडीवर मतदार ओळखपत्र लिंक येईल. त्यानुसार मतदार ओळखपत्राची स्थिती सहजपणे पाहू शकता. महिन्यानंतर घरी मतदार ओळखपत्र मिळेल.
भारत निवडणूक आयोगाचं www.eci.gov.in हे अधिकृत संकेतस्थळ आहे. तर राज्यासाठी http://ceo.maharshtra.gov.in हे संकेतस्थळ उपलब्ध आहे. या संकेतस्थळावर सविस्तर माहिती मिळू शकते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.