Legislative Council Election : विधानपरिषदेवर भाजपचा पंजा! कोण आहेत उमेदवार? विधानसभेपूर्वी मास्टर स्ट्रोक

Legislative Council Election news in marathi : विधानपरिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांची निवड आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण मानली जात आहे. ओबीसी मतदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपने हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.

Legislative Council Election news in marathi
Legislative Council Election news in marathi esakal
Updated on

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने पाच उमेदवारांची घोषणा केली आहे. या यादीत पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे. विधानपरिषद निवडणुकीत एकूण ११ जागांसाठी मतदान होणार आहे आणि त्याचे निकाल १२ जुलैला जाहीर होतील. दरम्यान विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने मास्टर स्ट्रोक मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ओबीसी मतदारांना जवळ करण्याचा प्रयत्न तसेच दिग्गज नेत्यांचे पुनर्वसन भाजपने केले आहे. 

भाजपचे उमेदवार कोण आहेत?

पंकजा मुंडे

पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही पराभव पत्करला. आता भाजपने त्यांचे पुनर्वसन करत विधानपरिषदेवर पाठवले आहे.

योगेश टिळेकर

योगेश टिळेकर पुणे महानगरपालिकेत नगरसेवक होते आणि त्यांनी २०१४ मध्ये हडपसर मतदारसंघातून विधानसभेचे सदस्यत्व मिळवले होते. ते भाजपच्या ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्षही राहिले आहेत.

परिणय फुके

डॉ. परिणय फुके हे आंतरराष्ट्रीय जलतरणपटू असून नागपूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. ते भंडारा-गोंदिया मतदारसंघातून विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले होते. २०१४ ते २०१९ दरम्यान ते राज्यमंत्री होते आणि भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते.

अमित गोरखे

कोरोना काळात अमित गोरखे यांनी भाजपचे कोविड टास्क फोर्स प्रमुख म्हणून उल्लेखनीय कार्य केले. ते पिंपरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे निवडणूक प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी 'मन की बात' कार्यक्रम लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी महत्वपूर्ण काम केले आहे.


Legislative Council Election news in marathi
Hardik Pandya: पांड्याचा रडका चेहरा पाहून आनंद महिंद्रा झाले भावूक, म्हणाले...

सदाभाऊ खोत

सदाभाऊ खोत यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह मोहिते पाटील यांना आव्हान दिले होते. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांनी कृषीराज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. ते स्वाभिमानी संघटनेपासून दूर होऊन रयत क्रांती संघटनेचे नेतृत्व करत आहेत.

भाजपचा रणनीतिक निर्णय

विधानपरिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांची निवड आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण मानली जात आहे. ओबीसी मतदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपने हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने या पाच उमेदवारांची निवड करून पक्षाच्या राजकीय रणनीतीला बळकटी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात मिळाली आहे. 


Legislative Council Election news in marathi
Sambhaji Bhide: "...तर तुमच्या मिशा कापू"; महिला संघटनेचा संभाजी भिडेंना इशारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.