नोव्हेंबरअखेर सोलापूरहून विमानाचे ‘उडान’! विमानसेवा परवान्याचा 15 दिवसांत प्रस्ताव; सप्टेंबरअखेरीस ‘DGCA’चे पथक सोलापुरात; अंतिम पाहणीनंतर मिळेल परवानगी

सोलापूर होटगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी उच्चस्तरीय हालचाली सुरू आहेत. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली होती. आता विमानसेवेच्या परवान्याचा प्रस्ताव १५ सप्टेंबरपर्यंत 'डीजीसीए'ला पाठविला जाणार आहे.
solapur airport
solapur airportsakal
Updated on

सोलापूर : सोलापूरच्या होटगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी आता उच्चस्तरीय हालचाली सुरू झाल्या आहेत. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली होती. त्यानंतर आता विमानसेवेच्या परवान्यासाठी प्रस्ताव तयार केला जात असून १५ सप्टेंबरपर्यंत तो प्रस्ताव डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनकडे (डीजीसीए) पाठविला जाणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात महामार्गाची कनेक्टिव्हिटी वाढल्यानंतर स्मार्ट सिटीतील सोलापूरकरांना आता विमानसेवेची प्रतीक्षा आहे. पुणे, मुंबईतील एमआयडीसी हाऊसफुल झाल्यानंतर सोलापूर शहर- जिल्ह्यात उद्योगवाढीला मोठा वाव आहे. पण, येथे आयटी कंपन्या नाहीत, मोठ्या प्रमाणावर रोजगार देणारे व अपेक्षा पूर्ण करणारे नवीन उद्योग नाहीत.

सोलापूर जिल्ह्यात दरवर्षी पाच हजार अभियंते शिक्षण पूर्ण करतात, पण नोकरीच्या निमित्ताने बहुतेकजण परजिल्ह्यातच जातात. दरम्यान, आता सोलापूर जिल्ह्यात कासेगाव, कुंभारी, मोडनिंब, अतिरिक्त चिंचोली या ठिकाणी नवीन एमआयडीसींचे प्रस्ताव आहेत. सोलापूर शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे इंदिरा गांधी पार्क स्टेडिअम आहे, पण विमानसेवा नसल्याने आंतरराष्ट्रीय सामने होण्यास अडचणी आहेत. अनेक उद्योजकांना सोलापुरात यायचे आहे, पण विमानसेवा नसल्याची त्यांची ओरड आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राच्या ‘उडान’ योजनेतून सोलापूरची विमानसेवा सुरू करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

विमानसेवा परवान्याचा प्रस्ताव याच महिन्यात पाठविला जाईल

होटगी रोड विमानतळावरील रन-वे, ड्रेनेज, इमारत, पाणी अशा सुविधा पूर्ण झाल्या आहेत. वॉल कंपाऊंडचे काम काही दिवसांत होईल. ‘डीजीसीए’ व ’बिकास’च्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर भेट देऊन सर्व बाबींची पाहणी, पडताळणी केली आहे. आता १५ दिवसांत विमानसेवेच्या परवानगीचा प्रस्ताव ‘डीजीसीए’ला पाठविला जाईल. त्यानंतर ‘डीजीसीए’कडून पुन्हा एकदा पाहणी होईल व त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्रुटींची पूर्तता केली जाईल. त्याचा अंतिम अहवाल पाठविल्यानंतर परवानगी मिळेल, असा विश्वास आहे.

- बानोत चाम्पला, विमानतळ अधिकारी, सोलापूर

नोव्हेंबरअखेर विमानसेवा शक्य

श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची ९२ मीटर चिमणी १५ जून रोजी जमीनदोस्त केली. तेव्हापासून सोलापूरकरांना विमानसेवेची प्रतीक्षा असून अन्य अडथळे देखील हटविण्यात आले आहेत. विमानतळावरील कामे देखील पूर्ण झाली आहेत. आता केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून सोलापूरची विमानसेवा सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी विमानसेवेसाठी परवानगी मिळू शकते. त्यानंतर नोव्हेंबरअखेर विमानसेवा सुरू होईल, अशी सर्वांनाच आशा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()