रायगड- उद्धव ठाकरे हे रायगड दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पेण येथे सभा घेत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी करणारे गोविंद देवगिरी महाराज यांचा देखील त्यांनी समाचार घेतला आहे. मोदींची शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणारे बिनडोक आहेत, असं म्हणत त्यांनी निशाणा साधला.
कोणी कुणाला काय मानायचं हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोणी मोदींना देव मानत असेल तर आमचं काहीही म्हणणं नाही. पण, तुम्ही मोदींची तुलना आमच्या देवतासोबत केली. छत्रपशी शिवाजी महाराज आमचे देवत आहेत. कुणाचीही तुलना महाजारांसोबत करणारे निर्बुद्ध आहेत, असं ठाकरे म्हणाले. (Fools comparing PM Modi to Chhatrapati Shivaji Maharaj Uddhav Thackeray targets Govind Devagiri Maharaj)
एकतरी साम्य आहे का? शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला देखील हात लावाल तर याद राखा म्हणणारे महाराज होते. पण, आज शेतकरी आत्महत्या करतोय. पीकविमा मिळत नाहीये. आपत्तीकाळात मदत मिळत नाहीये. जनधन योजनेचा लाभ मिळत नाहीये, असं म्हणत ठाकरेंनी निशाणा साधला.
कोणीही असो ज्याने महिलांची विटंबना केली त्याचे हातपाय तोडण्याचे काम महाराजांनी केले आहे आणि तुम्ही मोदींबाबत बोलत आहात. मणिपूरमध्ये दोन महिलांची विटंबना झाली तरी मोदी मणिपूरमध्ये जात नाहीत. मणिपूरमधील घटना बघवत नाही. पण, मोदी याबाबत बोलायला तयार नाहीत. अशा लोकांची तुलना तुम्ही महाराजांसोबत करत आहात, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला.
उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारच्या अंतरिम बजेटवर देखील भाष्य केलं आहे. अदानी म्हणजे देश नाही. सीतारामजी तुम्ही महिलाबाबत बोलला मग मणिपूर मध्ये का नाही गेला? तिकडेसुद्धा महिला आहेत. बिल्कीस बानोकडे जा त्या सुद्धा महिला आहेत. अर्थसंकल्प म्हणजे टोपी घातल्याचा जादूचा प्रयोग आहे. मत दिल्यानंतर सिलिंडरच्या किमती दुपटीने वाढतील . ज्या शेतकऱ्यांनी वर्षभर आंदोलन केले तेव्हा तुम्ही त्यांना दहशतवादी ठरवले. निवडणुका आल्यामुळे त्याना शेतकरी ठरवत आहेत, असं ठाकरे म्हणाले. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.