Maharashtra Politics: भाजपच्या गोटात हालचालींना वेग! आज मुंबईत महत्त्वाची बैठक

आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटात घडामोडींना वेग
aashish shelar and devendra fadanvis
aashish shelar and devendra fadanvisaashish shelar and devendra fadanvis
Updated on

राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असतानाच आता आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. तीन दिवसांपूर्वी पुण्यात भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली या बैठकीला भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह भाजपचे राज्यातील सर्व संघटनेतील पदाधिकारी आणि नेते उपस्थित होते.

या बैठकीनंतर आता मुंबई भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर भाजपमध्ये संघटनात्मक बदलांची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या 2 दिवसांपूर्वी पुण्यात भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर आता मुंबई भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे.

aashish shelar and devendra fadanvis
Jyotiraditya Scindia : सिंधियांनी ट्विटर बायोवरून 'BJP' ला हटवलं? घरवापसीच्या टोमण्याला दिलं तिखट उत्तर

ही बैठक आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीनंतर भाजपमध्ये काही संघटनात्मक बदल केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे.

तर आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भाजपकडून मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी मिशन 145 आखण्यात आले आहे. याअतंर्गत मुंबई महापालिकेत दिडशे जागा जिंकून सत्ता मिळवण्याचं भाजपचं नियोजन आहे.

aashish shelar and devendra fadanvis
Ajit Pawar: “अजितदादा ज्या मस्तीत वागत होते, त्याच्या 10 टक्केही मुख्यमंत्री वागत नाहीत”

मुंबई महापालिका निवडणूक भाजप युतीत लढण्याची शक्यता आहे. मात्र भाजप नेत्यांकडून मुंबई महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असून, त्यासाठी बूथ लेव्हलचं नियोजन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक महत्त्वाची असल्याचं म्हंटलं जात आहे. या बैठकीनंतर संघटनात्मक स्थरावर काही बदल करण्यात येण्याची शक्यता आहे.

aashish shelar and devendra fadanvis
Raj Thackeray : शहर दत्तक घेतले, त्याचे काय झाले? राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.