MPSC Bharti : शासनाच्या विविध विभागातील रिक्त पदांवर भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पदनिहाय अटी-शर्तींचा सविस्तर तपशील सूचनापत्रात नमूद केले आहेत.
पात्रताधारक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदत दिलेली आहे. (For various posts of MPSC Application deadline is 11 September nashik news)
वेगवेगळ्या शासकीय विभागांतर्फे नोंदविलेल्या रिक्त पदांच्या मागणीच्या आधारे आयोगातर्फे जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये सर्व पदांच्या जाहिराती या ‘अ’ संवर्गातील पदांसाठी आहे. तसेच पदनिहाय शैक्षणिक अर्हता व अनुभव निश्चित करण्यात आला आहे. परीक्षेला पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.
सध्याच्या वेळापत्रकानुसार ११ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन परीक्षा अर्ज भरता येईल. भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याची मुदत १३ सप्टेंबरपर्यंत असून, चलनाद्वारे अंतिम शुल्क भरण्याची मुदत १४ सप्टेंबरपर्यंत असेल.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
...या पदांसाठी भरती
- उच्च व तंत्र शिक्षण विभाग : सहाय्यक सचिव (तांत्रिक), महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, गट- ‘अ’ संवर्ग (२ पद), सह संचालक- तंत्र शिक्षण/संचालक, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, गट- ‘अ’ संवर्ग (२ पद). शासकीय औषधनिर्माण महाविद्यालय, प्राध्यापक, गट- ‘अ’ संवर्ग (१२ पद). सहयोगी प्राध्यापक (४ पद).
- सार्वजनिक आरोग्य विभाग : वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट- ‘अ’ संवर्ग (२ पद).
- विधी व न्याय विभाग - सहाय्यक प्रारूपकार-नि-अवर सचिव, गट- ‘अ’ संवर्ग (३ पद).
- नियोजन विभाग - अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील उपसंचालक, सामान्य राज्य सेवा, गट- ‘अ’ संवर्ग (३४ पद).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.