सिन्नर: दिवसेंदिवस शहरात चोरीचे प्रकार वाढत आहेत. पोलिसांनी केलेल्या उपाययोजना तोकड्या असल्याचेच जणू चोरटे सांगत असल्याचे गेल्या पंधरा दिवसात घडलेल्या घटनांवरून दिसून येत आहे.
त्यातच आता धूमस्टाईलने जवळ येऊन सोने ओरबाडणे हेही नित्यनेमाचे झाले आहे. त्यामुळे नागरिकांत पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबतच शंका व्यक्त होत आहे. अशीच घटना शहरातील गजबजलेल्या ठिकाणी अर्थात सरदवाडी रोड येथे घडली आहे.
सावजी खानावळीच्या संचालिका ज्योती कमलाकर कोथळे या सकाळी साडेनऊच्या सुमारास आपल्या घराकडून सावजी खानावळ या व्यवसायाच्या ठिकाणी जात होत्या.
सरदवाडीकडील ब्रिजच्या दिशेने एक दुचाकीस्वार हॉटेल हेवन इनच्या समोर उभी करून थांबला. दुसरा व्यक्ती सौ. कोथळे यांच्याजवळ येऊन हिंदीत संभाषण करू लागला. या ठिकाणी खून झाला असून आपण इतकं सोनं का घातले आहे? दुचाकीवर बसलेले साहेब काय सांगत आहेत, ते बघा असे म्हणत कोथळे यांना दुचाकीस्वाराकडे घेऊन गेले.
त्यांना सोन्यासंदर्भात बोलत करून सोन काढून ठेवण्यास सांगितले. कोथळे यांनीही आपली दोन तोळ्याची पोत आणि हातातील एक तोळ्याची अंगठी काढून पाकिटात ठेवत असताना त्यातील एका भामट्याने ते पाकिट सोन्यासह हिसकावले. सौ. कोथळे यांनी त्याला प्रतिकार केला, मात्र त्यांना पाठीचा त्रास असल्यामुळे त्या त्याला फार काही प्रतिकार करू शकल्या नाहीत.
याचाच फायदा घेत चोरांनी तेथून काळया रंगाच्या पल्सरवर हेल्मेट परिधान करत पळ काढला. सरदवाडी रोड येथे अनेक ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हे चोरटे कैद झालेले आहेत. त्यांना लवकरात लवकर पकडावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दोन भामटे सीसीटीव्हीत कैद
घटनेची माहिती पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी येत पाहणी केली. पोलिसांनी परिसरातील काही व्यावसायिकांच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता त्यात दुचाकीवरून सुसाट जात असताना दोन्ही भामटे कैद झालेले आढळले. मात्र, दुचाकी व त्यांचे चेहरे त्यात स्पष्ट दिसत नसल्याने त्यांचा शोध घेण्यास अडचण निर्माण होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.