Scholarship : परदेश शिष्यवृत्तीचे निकष बदलले

परदेश शिष्यवृत्तीच्या निकषांमध्ये बदल करण्याची मागणी ‘बार्टी’, ‘सारथी’, ‘महाज्योती’, ‘टीआरटीआय’ आदी संस्था व संबंधित विभागाच्या विद्यार्थी संघटनांकडून करण्यात येत होती.
Scholarship
Scholarship sakal
Updated on

मुंबई : परदेश शिष्यवृत्तीच्या निकषांमध्ये बदल करण्याची मागणी ‘बार्टी’, ‘सारथी’, ‘महाज्योती’, ‘टीआरटीआय’ आदी संस्था व संबंधित विभागाच्या विद्यार्थी संघटनांकडून करण्यात येत होती. त्याअनुषंगाने अधिछात्रवृत्ती व परदेश शिष्यवृत्तीच्या निकषांमध्ये बदल करण्यात आले आहेत. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय विभागाने जारी केला आहे.

परदेश शिष्यवृत्ती योजना

सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, आदिवासी विकास विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, अल्पसंख्याक विकास विभाग, नियोजन विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग या विभागांमार्फत स्वतंत्रपणे राबविण्यात येते.

या सर्व विभागांच्या परदेश शिष्यवृत्ती योजनेत एकवाक्यता येण्याच्या उद्देशाने या योजनेच्या निकषांमध्ये ३० ऑक्टोबर २०२३ रोजीच्या शासन निर्णयापूर्वी ‘बार्टी’ (प्राप्त अर्ज ७६३), ‘सारथीर् (प्राप्त अर्ज एक हजार ३२९), ‘महाज्योती’ (प्राप्त अर्ज एक हजार ४५३) या संस्थांमार्फत देण्यात आलेल्या अधिछात्रवृत्ती जाहिरातींनुसार आलेल्या अर्जामधील कागदपत्रांची पडताळणी करून व शपथपत्र घेऊन एकूण तीन हजार ५४५ संशोधक विद्यार्थ्यांपैकी पात्र संशोधक विद्यार्थ्यांना ५० टक्के दराने सरसकट अधिछात्रवृत्ती मंजूर करण्यास मान्यता देण्यात येणार आहे.

  • आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या परदेश शिष्यवृत्ती योजनेसाठी विहित निकषानुसार विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास

  • कुटुंबाच्या उत्पन्नाची वार्षिक मर्यादा व ‘क्यूएस वर्ल्ड रॅकिंग’ची मर्यादा शिथिल करून विद्यार्थ्यांस परदेश शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येईल. तथापि, हा

  • लाभ देताना उत्पन्नाची वार्षिक मर्यादा आठ लाखांपासून जास्तीत जास्त दहा लाखांपर्यंत शिथिल करण्यात यावी, असेही शासन निर्णयात नमूद केले आहे.

अधिछात्रवृत्तीसाठी

  • ‘बार्टी’, ‘सारथी’, ‘महाज्योती’ या संस्थांमार्फत देण्यात येणाऱ्या अधिछात्रवृत्तीसाठी निश्चित मर्यादा २०० वरून ३००

  • आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था या संस्थेमार्फत देण्यात येणाऱ्या अधिछात्रवृत्तीसाठी मर्यादा १०० वरून २००

  • परदेशातील पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्याने भारतातील मान्यता प्राप्त विद्यापीठांमधून किमान ५५ टक्के गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्‍यक

  • पीएच. डी.साठी विद्यार्थ्यांने भारतातील मान्यता प्राप्त विद्यापीठांमधून किमान ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी

  • शैक्षणिक शुल्क थेट संबंधित शैक्षणिक संस्थेस दिले जाणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.