वीज बिल माफी तर सोडाच, सत्ताधाऱ्यांकडून कनेक्‍शन तोडणीही थांबेना

सत्तेतील काही मंत्री, आमदारांनी निवडणुकीपूर्वी वीज बिल माफीची घोषणा केली. पण, त्याला बगल देऊन आता सप्टेंबर 2020 नंतरची बिले न भरलेल्यांची वीज तोडणी मोहीम महावितरणने हाती घेतली आहे.
maharashtra
maharashtraSakal
Updated on

सोलापूर : दोन लाखांवरील थकबाकीदार शेतकऱ्यांना दोन लाखांची कर्जमाफी मिळेल, शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करू, नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 50 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान देऊ, ऊस उत्पादकांना एकरकमी एफआरपी मिळेल, शेतकरी आत्महत्या थांबतील, असे अनेक आश्‍वासने सत्तेतील पक्षांनी निवडणुकीपूर्वी दिली. पण, राज्यातील शेतकरी आत्महत्या कमी झालेल्या नाहीत, ऊस उत्पादकांना एकरकमी एफआरपीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. दोन लाखांवरील कर्जमाफी नाही, नियमित कर्जदारांना 50 हजार मिळाले नाहीत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे थकीत वीजबिल माफी सोडाच, महावितरणकडून सवलतही दिली जात नसून आता थकबाकीदार शेतकऱ्याची अडचण जाणून न घेता जागेवरच वीज कनेक्‍शन तोडणी सुरु झाली आहे. कोरोनाशी मुकाबला करून राज्याच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावणारा शेतकऱ्यासमोर आता जगावे की मरावे, एवढाच प्रश्‍न शिल्लक राहिला आहे.

maharashtra
इंग्रजीचा पहिला पेपर कॉपीमुक्‍त! जिल्ह्यातील 927 विद्यार्थी परीक्षेला गैरहजर

राज्यासाठी दररोज 16 हजार 443 मेगावॅट एवढी वीज लागते. आता उन्हाळ्यामुळे मागणीत वाढली आहे. नियमित वीजबिल भरणाऱ्यांना विनाखंडीत वीज देण्यासाठी महावितरणला 70 हजार कोटींच्या थकबाकीमुळे अडचणी येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील महावितरणच्या 16 विभागाअंतर्गत 44 सर्कल अधिकाऱ्यांना थकबाकी वसुलीचे टार्गेट देण्यात आले आहे. मार्चएण्डपर्यंत एकूण थकबाकीतील 70 टक्‍क्‍यांपर्यंत वसुली करावीच लागेल, असे स्पष्ट निर्देश वरिष्ठ स्तरावरून असल्याचे सूत्रांनी सांगितले. शासकीय पाणी पुरवठा योजना, रस्त्यांवरील दिवाबत्ती, शासकीय कार्यालये व शाळांकडेही महावितरणचे जवळपास सात ते आठ हजार कोटींची थकबाकी आहे. त्यासाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही थकबाकीची पूर्ण रक्‍कम मिळालेली नाही. तरीही, महावितरणने शेतकऱ्यांनाच टार्गेट केले आहे. उर्जामंत्री नितीन राऊत यांनी शेतकऱ्यांसाठी कृषीपंप वीज सवलत धोरण जाहीर केले, परंतु एकूण थकबाकीतील 35 टक्‍के भरायलाही काही शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. सततचा दुष्काळ, अतिवृष्टी, महापूर, शेतमालाचे दर गडगडलेले, एकरकमी एफआरपीसाठी संघर्ष, दुधाला चांगला दर नाही, जनावरांचा चारा महागला, शेतीची मशागत महागली, अशा स्थितीत शेती हा व्यवसाय अडचणीत गेला. शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा आता स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी व मुलांच्या भविष्यासाठी झगडतोय. तरीही, शेतातील पिकाला पाण्याची गरज असतानाही महावितरणकडून कनेक्‍शन तोडणी सुरु असल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे.

maharashtra
शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टीचे आणखी 20 कोटी! 31 मार्चपूर्वी वाटपाचे आदेश

घरगुती असो वा कृषीपंप किंवा वाणिज्य, औद्योगिक ग्राहकांकडील थकबाकी वसुलीसाठी त्यांचे कनेक्‍शन तोडण्याची मोहीम सुरु आहे. सप्टेंबर 2020 पासूनची सर्व बिले त्यांनी भरावीत हाच कारवाईचा हेतू आहे. 31 मार्चपर्यंत अधिकाधिक थकबाकी वसुली अपेक्षित आहे.
- संतोष सांगळे, अधीक्षक अभियंता, महावितरण, सोलापूर

maharashtra
सोलापूरचे निर्बंध शिथिल कधी? शहरात अवघे तीन रुग्ण; ग्रामीणमधील रुग्णही घटले

कृषीपंप वीज धोरणाला निकषाचा अडथळा
कृषीपंप वीज धोरणाअंतर्गत सप्टेंबर 2020 नंतरची संपूर्ण बिले नियमित भरली आहेत आणि सप्टेंबर 2020 पूर्वीच्या एकूण थकबाकीतील 35 टक्‍के रक्‍कम भरली आहे, त्यांचीच संपूर्ण थकबाकी माफ होणार आहे. मात्र, कोरोनाचे निर्बंध, शेतमालाचे गडगडलेले दर, उसाच्या एकरकमी एफआरपीची प्रतीक्षा, पिकांवरील रोग, यामुळे संकटात सापडलेला बळीराजा सप्टेंबर 2020 नंतरही थकला. त्या निकषांमुळे त्यांना कृषीपंप वीज धोरण योजनेचा लाभ घेता येत नसल्याची स्थिती आहे. त्यांनाही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सोडले नसून त्यांचेही कनेक्‍शन कापले जात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()