अमरावतीच्या राजकारणात आमदार बच्चू कडू आणि नवनीत राणा व रवी राणा यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. कडू व राणा यांच्यातील वाद आणि एकमेकांवरील टीका सतत पाहायला मिळत असते. यातच लोकसभा निवडणुकीत भाजपकडून लढलेल्या नवनीत राणा यांचा पराभव झाला. यासाठी राणा बच्चू कडू यांना जबाबदार धरतात. कारण महायुतीत असतानाही कडू यांनी त्यांच्या पक्षाचा उमेदवार दिला होता.
आता अमरावतीतील परतवाडातील दहीहिंडी कार्यक्रमात आपल्या पराभवाबद्दल संताप व्यक्त करत नवनीत राणांनी बच्चू कडूंवर जोरदार टीका करत हिशोब होणारच असे म्हटले.
या दहीहंडी कार्यक्रमात बोलताना माजी खासदार नवनीत राणा म्हणाल्या, "लोकसभेत पराभूत झाल्यानंतर मी पहिल्यांदा आले आहे. काही सुपारी बहाद्दरांनी सुपारी घेतली होती पाडण्याची. इथं आपले काही भाऊ आहेत, जे कोणालातरी पाडण्याची सुपारी घेतात. माहीत आहे ना कोण आहे? सगळ्यांना माहित आहे."
पुढे बोलताना राणा म्हणाल्या, "हे शहर आता खूप कडू झाले आहे. माझ्या पराभवामुळे जिल्हा दहा वर्षे मागे पडला आहे. या अचलपूरमध्ये गेल्या 20 वर्षात एकाही नवा उद्योग आला नाही. इथले प्रतिनिधी मंत्री होते तेव्हा सुद्धा एमआयडीसीत एक कंपनी आणता आली नाही. इथे उभारलेल्या युवकांना नोकरी नाही. आता तुम्ही या सगळ्याचा हिशोब कारयचा आहे. आता माफी नाही."
नुकतेच अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाला होता. येथून काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे विजयी झाले आहेत. निकराच्या लढतीत त्यांनी नवनीत राणा यांचा १९७३१ मतांनी पराभव केला होता.
याआधी 2019 च्या निवडणुकीत नवनीत राणा यांनी येथून अपक्ष उमेदवार म्हणून विजय मिळवून आपली क्षमता सिद्ध केली होती. नवनीत राणा यांनी 2019 ची निवडणूक अपक्ष म्हणून जिंकून सर्वांना आश्चर्यचकित केले आणि पहिल्यांदाच खासदार झाल्या. यावेळी त्या पुन्हा अमरावतीतून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.