Malegaon : धर्मांतर करतो म्हणून प्राचार्याचे निलंबन! ठाकरे गटाच्या आमदाराच्या कॉलेजमध्ये प्रार्थनेवरुन वाद

former bjp  MLC Apoorva Hiray  college principal suspended fir lodged for luring students towards islam malegaon news
former bjp MLC Apoorva Hiray college principal suspended fir lodged for luring students towards islam malegaon news
Updated on

राज्यात धार्मिक तणावाच्या घटना समोर येत असतनाच मालेगाव येथे एका महाविद्यालयाच्या प्राचार्यास सस्पेंड करण्यात आले आहे. तसेच त्यांच्याविरोधात FIR देखील दाखल करण्यात आली आहे.

या प्राचार्यांवर काँलेजमध्ये करियर गायडन्स सेमिनारच्या आड विद्यार्थांना इस्लामकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या सेमिनारची सुरूवात एखा एस्लामिक प्रार्थनेने झाली होती असाही आरोप करण्यात आला आहे.

महाराज सयाजीराव गायकवाड आर्ट्स, सायंन्स अँड कॉमर्स कॉलेजचे संचालन शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे नेते आणि भाजपचे विधानपरिषदेचे माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांच्याकडे आहे. हिंदुत्ववादी संगटनांकडून या सेमिनारच्या आयोजनाल विरोध करण्यात आला तसचे आरोप करण्यात आला की विद्यार्थ्यांना इस्लामकडे आकर्षित केलं जात आहे. यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर मंत्री दादा भुसे यांनी देखील या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे.

former bjp  MLC Apoorva Hiray  college principal suspended fir lodged for luring students towards islam malegaon news
Maharashtra Politics : ठिणगी पडणार? राज्यात CM शिंदे हे फडणवीसांपेक्षा जास्त फेमस! शिवसेनेच्या जाहिरातीने खळबळ

हिरे परिवाराकडून चालवल्या जाणाऱ्या या कॉलेजमध्ये संरक्षण क्षेत्रातील संधी यांसंबंधी एक करियर गायडन्स काउंसिलिंग प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्र स्थानिक संघटना सत्य मलिक लोक सेवा समूह यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. त्यांनी पुण्यातील अनीस डिफेंस करियर इंस्टीट्यूट चे अनीस कुट्टी यांना कॉलेजमध्ये निमंत्रीत केले होते.

former bjp  MLC Apoorva Hiray  college principal suspended fir lodged for luring students towards islam malegaon news
BJP : भाजपचं लोकसभा निवडणुकीत काय होणार? तामिळनाडू ते हरियाणातील सहकारी पक्षात नाराजी

प्राचार्य काय म्हणाले?

निलंबीत करण्यात आलेले प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांनी सांगितले की, कार्यक्रमची सुरूवात एका छोट्या इस्लामिक प्रार्थानेने करण्यात आली, त्यानंतर वक्त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. कार्यक्रम संपतेवेळी मोठ्या संख्येने लोक हॉलमध्ये घुसले आणि दावा करू लागले की हा कार्यक्रम इस्लामच्या प्रचाराचा प्रयत्न आहे. निकम यांनी सांगितलं की कार्यक्रमाची सुरूवात एका लहान अरबी मंत्राने करण्यात आली होती, कारण की ही संघटना त्यांच्या इतरही सर्व कार्यक्रमाची सुरूवात याच प्रकारे करत आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.