प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी नरेंद्र मोदी, मोहन भागवत यांना आमची सत्ता आली, तर तुरुंगात डांबू, असे विधान केले होते.
सातारा : प्रकाश आंबेडकर हे तर्कविसंगत, बेलगाम वक्तव्ये करतात. दृष्ट भावनेने भाजप, पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर बेछूट टीका करतात. वंचित बहुजन आघाडीचा जीव किती, ताकद किती? याचा अंदाज न घेता मोदींवर अर्वाच्य भाषेत बोलणे अशोभनीय आहे. केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी ते आरोप करत असतात, अशी टीका भाजपचे माजी खासदार अमर साबळे यांनी केली.
येथील शासकीय विश्रामगृहात साबळे (Amar Sable) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी उपस्थित होते. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी नरेंद्र मोदी, मोहन भागवत यांना आमची सत्ता आली, तर तुरुंगात डांबू, असे विधान केले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची, संस्कृतीची आणि मानवतेशी कायम प्रामाणिक राहून संविधानाची निर्मिती केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने डॉ. आंबेडकर यांच्या विचारांशी प्रामाणिक राहून दीड लाख सेवा प्रकल्प उभे केले आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी किती सेवा प्रकल्प राबवले आहेत, हे जाहीर करावे.
‘इंडिया’ आघाडीत प्रकाश आंबेडकर यांना कोणी घ्यायला तयार नाही. त्यामुळे सनसनाटी निर्माण करून आपली दखल घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांचा राजकीय इतिहास पाहिला, तर त्यांना सोबत घ्यायला कोणी तयार नाही, अशी टीका करतानाच साबळे यांनी ‘प्रकाश आंबेडकर हे पीएम मोदींवर हिटलरचा आरोप करतात, हे दुर्दैवी आहे,’ अशीही खंत व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.