Ashok Chavan Profile: पुणे विद्यापीठात गिरवले राजकारणाचे पहिले धडे; जाणून घ्या अशोक चव्हाणांची राजकीय कारकीर्द

Ashok Chavan joins BJP : मिलिंद देवरा, नंतर बाबा सिद्दीकी आणि आता काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे.
Ashok Chavhan Profile
Ashok Chavhan Profileesakal
Updated on

राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्यात काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. आधी मिलिंद देवरा, नंतर बाबा सिद्दीकी आणि आता काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आज अशोक चव्हाण भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत.

अशोक चव्हाण यांची राजकीय कारकीर्द

पुणे विद्यापीठात शिक्षण घेत असताना अशोक चव्हाण हे विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी बनले. त्यावेळी अशोक चव्हाण यांच्यातील नेतृत्व गुण विकसित झाले. या काळात तरूणांना एकत्र करण्यात अशोक चव्हाण यशस्वी झाले. 1995 ते 1999 या काळात त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये महत्वाची जबाबदारी स्वीकारली. काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात केली. पुढे 2014 ते 2019 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचं अध्यक्षपद त्यांच्याकडे आलं. ऑगस्ट 2023 ते आजपर्यंत अशोक चव्हाण हे काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य होते.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे (Congress) महाराष्ट्रातील प्रमुख नेते अशी अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची ओळख आहे. त्यांचे वडील शंकरराव चव्हाण हे देखील महाराष्ट्राचे दोन वेळा मुख्यमंत्री होते. 1987 मध्ये अशोक चव्हाण हे पहिल्यांदा नांदेड लोकसभा मतदार संघामधून संसदेत गेले. यानंतर 1992 मध्ये ते विधानपरिषद सदस्य बनले. 1995 ते 1999 ते महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे महासचिव राहिले आहेत.

यानंतर 2003 मध्ये ते विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. 2008 मध्ये विलासराव देशमुखांनी राजीनामा द्यावा लागल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले होते. मात्र नंतर आदर्श घोटाळ्यामध्ये नाव आल्याने 2010 त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं. त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली. 2015 मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षही होते

मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी

1987-1989 या काळात अशोक चव्हाण यांनी नांदेड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. ते जिंकून आले. 1992 मध्ये ते महाराष्ट्र विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले. 1993 साली सार्वजनिक बांधकाम, नगरविकास आणि गृह राज्यमंत्री म्हणून ते सरकारमध्ये सामील झाले. 2003 मध्ये विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे वाहतूक, बंदरे, सांस्कृतिक कार्य आणि प्रोटोकॉल मंत्रिपदाची जबाबदारी दिली. 8 डिसेंबर 2008 ते 9 नोव्हेंबर 2010 या काळात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आहे.

आपल्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा

अशोक चव्हाण यांनी १२ फेब्रुवारी रोजी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन चर्चा चर्चा केली होती. अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना त्यामुळे उधाण आले होते. त्यांनी काल आपल्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. आज त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. आगामी काळात त्यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.