'राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर अध्यक्षपदासाठी वेळ मागितली, पण..'

Rahul Gandhi
Rahul Gandhiesakal
Updated on

सातारा : मोदी-शहांशी (Narendra Modi-Amit Shah) लढताना काँग्रेसच्या अध्यक्ष (Congress President) पदाची खुर्ची रिकामी ठेऊन लढता येणार नाही. त्यामुळे आता अध्यक्ष पदाच्या हालचाली सुरू आहेत. निवडणूक झाली तर कोणीतरी उभा राहिल. आमची इच्छा राहुल गांधीनीच (Rahul Gandhi) अध्यक्ष व्हावे, अशी आहे. राष्ट्रीय स्तरावर काम करताना हिंदी भाषेवर (Hindi language) प्रभुत्व हवे आहे, मुळात महाराष्ट्रातील बहुतेक लोक राष्ट्रीय पातळीवर काम करण्यास इच्छुक नसतात, असे स्पष्ट मत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Congress Leader Prithviraj Chavan) यांनी व्यक्त केले. (Former Chief Minister Prithviraj Chavan Revealed About The Post Of Congress Party President Political News bam92)

Summary

वर्षभरापूर्वी राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. हंगामी अध्यक्ष म्हणून सोनियांनी काम करायचे होते. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मी वेळ मागितला. मात्र, तो वेळ मला दिला नसल्याचे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले, प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोलेंचे (Congress state president Nana Patole) काम संघटना बळकट करण्याचे आहे. प्रत्येकाची काम करण्याची पध्दत वेगवेगळी असते, कोण आक्रमक असते, कोण थंड डोक्याने काम करते. पटोले काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भेटून त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने स्वबळावर लढण्याबाबत ते बोलले असतील. पण, अशा बोलण्याने महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) अडचणीत येणार नाही, असे ही त्यांनी नमूद केले. सध्या विविध घडमोडींच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी झालेल्या चर्चेत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची सध्याची कार्यपध्दती कितपत पचनी पडत आहे, या प्रश्नावर श्री. चव्हाण म्हणाले, पक्षाध्यक्षाचे काम पक्ष, संघटना बळकट करण्याचे आहे. त्यानुसार ते काम करत आहेत. प्रत्येकाची काम करण्याची पध्दती वेगळी असते. कोणी आक्रमक असतात कोणी थंड डोक्याने काम करतात. पटोले आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भेटून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करत असून त्यातून बोलत आहेत.

Rahul Gandhi
ठरलं! ZP साठी काँग्रेसचा 'टाॅप प्लॅन'

त्यांनी स्वबळाची भाषा करणे कितपत योग्य आहे, या विषयी चव्हाण म्हणाले, कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ते आपले काँग्रेसचे सरकार आणूया, स्वबळावर लढूया असे बोलत असून ते योग्य आहे. यामध्ये सरकार महाविकास आघाडीला अडचणीत आणण्यासारखी बाब नाही. कारण, महाविकास आघाडीचे सरकार तयार करताना उच्च पातळीवर विचार करून झालेले आहे. त्यामुळे सध्याचे राज्यातील सरकार अडचणीत येणार नाही. केवळ कोविडमुळे अडचण झाली आहे, लवकरच वेगाने कामे होतील. प्रदेशाध्यक्षांना डावलून काँग्रेसच्या प्रभारी नेत्यांनी शरद पवारांना भेटणे यातून वेगळा संकेत जात नाहीत का, याविषयी श्री. चव्हाण म्हणाले, भेट कशी झाली कोणी घेतली मला माहिती नाही. या भेटीत सरकारचे ज्येष्ठ मंत्री होते, सरकार चालविताना कोऑर्डिनेशन आवश्यक आहे. सरकारचे काहीतरी काम असेल म्हणून ही मंडळी श्री. पवार यांना भेटली असतील. यामध्ये त्यांची चूक नाही. काँग्रेस पक्षाचे काम असेल त्यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मंत्र्यांसह भेटू शकतात. नाना पटोलेंना काय सल्ला द्याल, याविषयी अधिक बोलणे टाळत श्री. चव्हाण म्हणाले, अध्यक्ष म्हणून नाना पटोलेंची एक भूमिका आहे. प्रत्येकाची कामाची वेगवेगळी पध्दत असते. पण, त्यामागचा उद्देश पक्ष, संघटना बळकट करणे व पक्षाला एक नंबर आणायचे यासाठी आपापल्या पध्दतीने काम करत आहेत.

Rahul Gandhi
शिवेंद्रसिंहराजे पराभवाचा वचपा काढणार?

राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी तुम्हीही इच्छुक होता. त्यासंदर्भात तुम्ही पक्षश्रेष्टींना पत्रही पाठविले होते. याविषयी विचारले असता श्री. चव्हाण म्हणाले, राहूल गांधीचा अध्यक्ष होण्यासाठी विरोध होता. त्यामुळे आम्ही काँग्रेस अध्यक्षांची भेट मागितली होती. पण, प्रत्यक्षात भेट झाली नाही. आमच्या व्यथा ऐकूण घ्याव्यात यासाठी आमचा प्रयत्न होता. वर्षभरापूर्वी राहूल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. हंगामी अध्यक्ष म्हणून सोनियाजींनी काम करायचे होते. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मी वेळ मागितली ती दिली नाही. त्यामुळे मी पत्र लिहिले होते. पण, या पत्राचा विपर्यास केला गेला. मुळात हे पत्र गोपनीय होते, ते प्रकट करायला नको होते. मोदी-शहांशी लढताना काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची खुर्ची रिकामी ठेऊन लढू शकत नाही. त्यामुळे अध्यक्ष पदाच्या हालचाली सुरू आहेत. निवडणूक झाली तर कोणीतरी उभा राहिल. आमची इच्छा राहूल गांधीनीच अध्यक्ष व्हावे, अशी आहे. राष्ट्रीय स्तरावर काम करताना हिंदी भाषेवर प्रभुत्व हवे आहे, मुळात महाराष्ट्रातील बहुतेक लोक राष्ट्रीय पातळीवर काम करण्यास इच्छुक नसतात.

Rahul Gandhi
तीन आमदार, एक खासदार असूनही 'राष्ट्रवादी'ला मिळेना 'जिल्हाध्यक्ष'

राष्ट्रपती पदाच्या उमेदवारासाठी शरद पवार यांचे नाव पुढे येत आहे. प्रशांत किशोर यांच्याही भेटी झाल्या आहेत. याविषयी चव्हाण म्हणाले, या भेटी राष्ट्रपती पदासाठी होत्या की पंजाबच्या निवडणूकीबाबत होत्या या विषयी मला काहीही माहिती नाही. पवार साहेबांच्या घरी बैठक झाली त्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. मीडियाने त्याला तिसऱ्या आघाडीचे स्वरूप दिल आहे, मुळात तसे काहीही नव्हते, असे त्यांनी स्पष्ट केले. युपीएचा प्लॉट फॉर्म बळकट होणे गरजेचे आहे, याविषयी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मोदी व भाजपच्या विरोधात सर्व विरोधकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. त्यासाठी कोणाचा झेंडा, नाव काय या गोष्टींची चर्चा झाली पहिजे. मोदींविरोधात लढायचे असेल प्रादेशिक पक्षांनी एकट्याने लढून होणार नाही. सगळ्यांची ताकत एकवटली पाहिजे. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत सर्व विरोधकांनी एकत्र येण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.

Rahul Gandhi
SECC Data : 'फडणवीसांकडून सभागृहाची जाणीवपूर्वक दिशाभूल'

सध्या जिल्हा बँका, कारखान्यांना ईडीच्या नोटिसी येत आहेत. यामागची केंद्र सरकारची काय भूमिका असेल, यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ईडी ही केंद्र सरकारची चौकशी समिती आहे. काळा पैसा साठविणे व तो परदेशी पाठविणे याविषयी ती यंत्रणा काम करते. या सेंट्रल एजन्सीचा वापर विरोधकांना मोडण्यासाठी केंद्र सरकार वापर करत आहे. एखाद्या गुन्ह्याचा शोध घेण्याचा प्रयत्न या एजन्सींचा दिसत नाही. एखादा माणूस गुन्हेगार आहे, त्याला शिक्षा केली की तो निर्दोष आहे, चौकशीत नेमके काय सापडले याबाबत ईडीने स्पष्टपणे सांगितले पाहिजे. त्याऐवजी ईडीचे सत्र मागे लावले जाते. सीबीआय, इंटेलिजन्स, ईडी याबहुतेक एजन्सींना आपल्या पक्षाला राजकिय फायदा मिळावा व विरोधकांना मोडावे, यासाठी वापरले जात आहेत. गुन्हा शोधणे व गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठी वापर होताना दिसत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Former Chief Minister Prithviraj Chavan Revealed About The Post Of Congress Party President Political News bam92

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()