Manohar Joshi Passed Away: सिव्हिल इंजिनिअर ते शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री...मनोहर जोशी यांची कारकीर्द

Manohar Joshi Passed Away: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे आज निधन झाले. बुधवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते ८६ वर्षांचे होते.
Manohar Joshi Passed Away
Manohar Joshi Passed Away
Updated on

Manohar Joshi Passed Away: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे आज निधन झाले. बुधवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते ८६ वर्षांचे होते. मनोहर जोशी यांच्या पार्थिवावर मुंबईतील दादर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सच्चा शिवसैनिक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख होती.  (Former Maharashtra CM Manohar Joshi passes away at 86)

मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांचा जन्म २ डिसेंबर १९३७ रोजी रायगड जिल्ह्यातील नांदवी गावात झाला. त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (VJTI) मधून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदवी संपादन केली.

मनोहर जोशी यांची राजकीय कारकीर्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) मध्ये सामील होऊन सुरू झाली आणि नंतर ते शिवसेनेचे सदस्य झाले. १९८० च्या दशकात मनहर जोशी शिवसेनेचे प्रमुख नेते म्हणून उदयास आले. मनोहर जोशी हे त्यांचे संघटन कौशल्य आणि तळागाळातील संपर्कासाठी ओळखले जात होते.

मनोहर जोशी यांनी १९७० च्या दशकात शिवसेनेकडून विधान परिषदेवर निवडून येऊन आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर ते १९७६ ते १९७७ या काळात मुंबईचे महापौरही होते.

मनोहर जोशी यांनी १९९५-१९९९ पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. यानंतर, अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांना २००२-०४ साठी लोकसभा अध्यक्ष बनवण्यात आले. मनोहर जोशी मुंबई सेंट्रल मतदारसंघातून लोकसभेचे खासदार झाले. राज्यसभेचे खासदार म्हणूनही त्यांनी सहा वर्षे काम केले.

Manohar Joshi Passed Away
Manohar Joshi Passed Away: बाळासाहेबांचं एक पत्र अन् मनोहर जोशींनी झटक्यात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला!

१९९५ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यावर मनोहर जोशी यांची राजकीय ताकद वाढली. बाळासाहेब ठाकरे यांची पहिली पसंती होती. त्यांनी तत्कालीन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शरद पवार यांची जागा घेतली होती. राज्याची सत्ता शिवसेनेच्या हाती येण्याची ही पहिलीच वेळ होती.

मनोहर जोशी यांनी २ डिसेंबर २०२३ रोजी त्यांचा ८६ वा वाढदिवस साजरा केला. दादर येथील कार्यालयात त्यांच्या समर्थकांनी वाढदिवस साजरा केला. ते खूप आनंदी दिसत होते.

मे २०२३ पासून आजारी होते-

मनोहर जोशी हे मे २०२३ पासून आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त होते. त्यांना ब्रेन हॅमरेज झाला होता. त्यांना हिंदुजा हॉस्पिटलच्या आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. ते कोमात गेले होते. दरम्यान आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक हरवला. 

Manohar Joshi Passed Away
Manohar Joshi Passed Away: राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन; शिवसेनेचा सभ्य अन् सुसंस्कृत चेहरा हरपला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()