भगतसिंह कोश्यारींना का येते अजित पवारांची दया? राज्यपालपद स्वीकारण्याचं देखील सांगितलं कारण

former-governor-of-maharashtra-bhagat-singh-
former-governor-of-maharashtra-bhagat-singh-
Updated on

Bhagat Singh Koshyari: महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजणारे वक्तव्य केले आहे. २०१९ मध्ये पहाटे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतल्याच्या घटनेबद्दल कोश्यारी यांनी इंडिया टुडेला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे.

अजित पवार यांनी काही आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केला. अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सामिल झाले. पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी काका शरद पवार यांची साथ सोडल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली होती. आता भगतसिंह कोश्यारी यांनी अजित पवार यांची दया वाटत असल्याचे वक्तव्य केले आहे.

अजित पवार महाराष्ट्रात स्थिरस्थावर झालेले राजकारणी आहेत. जसे आपल्या राज्यातही मोठा नेता आहे, तो कितीही वेळा पराभूत झाला तरी हार मानत नाही. त्याचप्रमाणे अजित पवार यांना उपमुख्यमंत्री होण्यासाठी कितीही वेळा सांगितले तरी ते कितीही वेळा होण्यास तयार आहेत. मला कधीकधी त्यांची दया देखील येते, असे कोश्यारी म्हणाले.

कोश्यारी म्हणाले, अजित पवार हुशार माणूस आहेत. त्यांचा बेस मोठा आहे. संघटनेत मोठी पकड आहे. बहुतांश आमदार-खासदार त्यांच्याच बाजूने राहिले. प्रत्येकाचे स्वतःचे व्यक्तिमत्व आहे.

former-governor-of-maharashtra-bhagat-singh-
Shooting In Football Match : अमेरिकेत फुटबॉल सामन्यादरम्यान अंदाधुंद गोळीबार! पोलीस अधिकारीही सामील, तीन जणांची प्रकृती चिंताजनक

म्हणून राज्यपाल झालो-

महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून भगतसिंह कोश्यारी यांची कारकिर्द वादग्रस्त ठरली. राज्यपाल होण्याचे कारण त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, २०१६ मध्ये मी जाहीर केले होते की २०२९ लोकसभा निवडणूक लढणार नाही. राजकारण करणार नाही, असे देखील मी सांगितले होते. तेव्हा भाजपचे अध्यक्ष अमित शाह होते. मात्र महाराष्ट्राचे राज्यपाल व्हावे, असा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा होता. त्यामुळे मी महाराष्ट्रात आलो. (latest marathi news)

पंतप्रधान असे म्हणत असतील तर आपण त्यांचा आदर केला पाहिजे. काही दिवस का होईना. महाराष्ट्रात जायला हवे, असे मला वाटले. त्यामुळे मी त्याचे मत स्वीकारले आहे. त्यांची विनंती मान्य केली आणि महाराष्ट्रात राज्यपाल झालो. 

former-governor-of-maharashtra-bhagat-singh-
Chandrayaan - 3 : चंद्रावरील रहस्यांच्या शोधासाठी प्रज्ञान रोव्हरने सुरू केला प्रवास; इस्रोने शेअर केला Video

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.