Anil Deshmukh: अनिल देशमुख यांच्या सुटकेनंतर, जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

अनिल देशमुख यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले
Anil Deshmukh
Anil Deshmukhesakal
Updated on

Jayant Patil: राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची एक वर्ष १ महिना आणि २७ दिवसांनंतर तुरूंगातून सुटका झाली. यादम्यान आज आर्थर रोड जेलबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून अनिल देशमुख यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते.

Anil Deshmukh
Anil Deshmukh: अनिल देशमुख कोण आहेत? आजपर्यंतचा राजकीय प्रवास जाणून घ्या

यादरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज आम्हा सगळ्यांना आनंद झाला आहे अशी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "13 महिन्यांच्या कालखंडानंतर कोणताही आरोप नसताना जी व्यक्ती आरोपी आहे त्या व्यक्तीवर विश्वास ठेवून राज्याच्या गृहमंत्र्यांना अटक करण्याचं काम झालं.

अनिल देशमुख यांच्यावर कोणताही आरोप सिद्ध नाही. १०० कोटीचा आरोप शेवटी एक कोटीवर येऊन थांबला. आज कोणताही आरोप सिद्ध होत नाही, हे कळल्यानंतर न्यायालयानं अनिल देशमुख यांना सोडा असे आदेश दिले.

Anil Deshmukh
Lokayukta Bill : लोकायुक्त विधेयक मंजूर; मंत्र्यांवर असणार का लोकायुक्तांचा वचक ?

त्यानंतर लगेच सीबीआय कोर्टात गेली अनिल देशमुख यांची अटक वाढावी यासाठी निकराचे प्रयत्न जाणीव पूर्वक केले, काल कोर्टाने दिलेला निकाल अत्यंत बोलका आहे, या देशातील आणि राज्यातील परिस्थितीचं वर्णन करणारा आहे.

राष्ट्रवादीला जेरीला आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सत्तारूढ पक्षानं सातत्यानं केला. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना अटक करण्यात आली. आमच्या काळात सरकारला अडचणीत आणण्यासाठी अनेक कारवाया केल्या त्या मधल्या या दोन.

आज अनिल देशमुख सुटतात याचा आम्हाला आनंद आहे. ते पुन्हा राज्याच्या राजकारणात धडाडीनं काम करतील" असा विश्वास जयंत पाटलांनी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()