"मी वाझेंना कधीही भेटलो नाही" देशमुखांचा चांदिवाल आयोगासमोर जबाब

home minister anil deshmukh reaction on sachin waze
home minister anil deshmukh reaction on sachin waze esakal
Updated on

मुंबई - "मी (मुंबईचे बडतर्फ केलेले पोलीस अधिकारी) सचिन वाझे (sachin waze) यांना कधीही भेटलो नाही. मी त्यांना ओळखत नाही, त्यांचे नावही माहित नाही," असे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चांदीवाल आयोगाला सांगितले. मुंबईचे माजी पोलिस आय़ुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर (Anil Deshmukh) कथित खंडणीबाबत केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चांदीवाल समिती (Chandiwal Commission) नेमली आहे. या समितीसमोर देशमुखांना आज हजर करण्यात आले. त्यावेळी देशमुख म्हणाले

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या लाचखोरीच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चांदिवाल आयोगाची नियुक्ती केली आहे. आज चांदिवाल आयोगासमोर आज निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्या वकिलाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची उलटतपासणी केली. यावेळी वाझे यांचे वकील अॅड. नायडू याने अनिल देशमुख यांना अनेक प्रश्न विचारले. यातील एका प्रश्नाला उत्तर देताना आपण सचिन वाझेला ओळखत नसल्याचे अनिल देशमुख यांनी म्हटले.

home minister anil deshmukh reaction on sachin waze
नितेश राणे यांची सिंधुदुर्ग पोलिसांकडून दीड तास चौकशी

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी विचारण्यात आलेल्या प्रश्नांची देशमुखांनी दिली उत्तरे

वाजेचे वकिल डाॅ नायर : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी आपण तपासणीचे आदेश सीआयडीला दिले होते का ?

देशमुख : सीआयडीच्या अधिकाऱ्यांना मी आदेश दिले होते. यात चौकशी झाल्याचे कळवले. त्यामुळे पुन्हा चौकशी करण्याची गरज नसल्याचे सांगितले. पण मी त्या तपासा संदर्भात समाधानी नव्हतो. कारण त्या प्रकरणात व्यवस्थित चौकशी झाली. म्हणून मी पुन्हा चौकशीचे आदेश इतर अधिकाऱ्यांना दिले. मात्र या प्रकरणाचा आणि त्या प्रकरणाचा काहीही संबध नाही.

डाॅ नायर - ते कोण अधिकारी आहेत? ज्या़नी तुम्हाला पुन्हा अन्वय नाईक आत्महत्या चौकशीची गरज नसल्याचे सांगितले.

देशमुख : मला आठवत नाही

डाॅ नायर : असे कुठले कागदपत्र तुम्हाला अन्वय नाईक या़नी दिले. ज्याने करून तुम्ही पून्हा चौकशीचे आदेश दिले

देशमुख : मला आठवत नाही

डाॅ नायर - सप्टेंबर महिन्यात सह पोलिस आयुक्तपदी नियुक्ती ही वाजेंच्या नियुक्ती पूर्वी करण्यात आली

देशमुख - मला आठवत नाही

डाॅ नायर : मिलिद भारंबे सह आयुक्त असताना सीआययू अधिकारी म्हणून वाजेंनी त्यांना रिपोर्ट करायला हवे

देशमुख : नियमानुसार करायला हवं

डाॅ नायर :- मिलिंद भारंबे यांनी कधी अशी तक्रार केली होती का? की, सचिन वाजे हे बायपास करतात प्रोटोकाॅल पाळत नाहीत अशी...

देशमुख - ३० मार्च रोजी आलेल्या रिपोर्टपूर्वी मला कोणतीही तक्रार आलेली नाही.

home minister anil deshmukh reaction on sachin waze
फक्त सहा ODI खेळणारा बाबर आझम ठरला 'ICC ODI Cricketer of 2021'

डाॅ नायर- जून २०२० ते मार्च २०२० पर्यंत तुम्ही केलेले ट्विट आणि पर्सनल व्हिडिओ जे सोशल मिडियावर केलेत. जे विविध तपासा संदर्भात होते. उदा दिलीप छाबरिया केस, फेक काॅलसेंटर केस, टिआरपी केस, फेक फाॅलोअर्स केस ?

देशमुख : उत्तर नाही दिले

डाॅ नायर - मार्च २०२० मुंबई पोलिसांनी फेक फेस मार्स केसची कारवाई केली होती का ?

देशमुख :- यावर देशमुखांच्या वकिलांनी आक्षेप घेत ही प्रकरणं वाजेंच्या नियुक्ती पूर्वीची आहेत.

डाॅ नायर :-अन्वय नाईक प्रकरणाची चौकशी व फेक मास्क प्रकरणात तांत्रिक चौकशीसाठी आपण वाजेची मदत घेतली होती का ?

देशमुख :- सचिन वाजेला मी चेहऱ्याने आणि नावानेही ओळखत नव्हतो.

डाॅ नायर :- कुंदन शिंदे व वैभव तुमाणे हे तुमचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करत होते का ?

देशमुख :- उत्तर दिले नाही

डाॅ नायर :- वैभव हे अन्वय नाईक व वाजे यांच्यात कार्डिनेट करायचे का ?

देशमुख :- आठवत नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.