Milk Price: 'देशी दारूची जेवढी किंमत तेवढे पैसे एक लिटर दुधाला द्या', माजी मंत्र्याची अजब मागणी

धाला भावच नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत असल्याचंही या नेत्याने म्हटंलं आहे
Milk Price
Milk PriceEsakal
Updated on

माजी मंत्र्यांनी एक अजब मागणी केली केली आहे. 'देशी दारूची जेवढी किंमत तेवढे पैसे एक लिटर दुधाला द्या', अशी मागणी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केलीय. 22 मे रोजी पुण्यात दुधाच्या प्रश्नावर रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून आम्ही यात्रा काढली होती त्यावरून दुग्धविकास मंत्रालयाने बैठक बोलवली आहे. देशी दारूच्या बाटलीची किंमत जेवढी आहे तेवढे पैसे एक लिटर दुधाला द्या अशी मागणी आहे, अशी माहीती माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली आहे. (Latest Marathi News)

इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक येथे रयतक्रांती संघटनेचा शेतकरी मेळावा पार पडला आणि या दरम्यान सदाभाऊ खोत बोलत होते. यावेळी सदाभाऊ खोत यांनी ही मागणी करत राज्य सरकारला इशाराही दिला आहे. 22 मे रोजी पुण्यामध्ये दुधाच्या प्रश्नावर रयत क्रांती संघटनेने यात्रा काढली होती. त्याची दखल घेऊन दुग्धविकास मंत्रालयाने बैठक लावली आहे. या बैठकीत आम्ही दुधासंबंधीचे प्रश्न मांडणार आहोत, असं सदाभाऊ खोत यांनी म्हंटलं आहे.(Latest Marathi News)

Milk Price
Shivsena: शिंदे गटात प्रवेश करताच मनिषा कायंदेंवर मोठी जबाबदारी, CM एकनाथ शिंदेंनी केली घोषणा!

तर गाईच्या दुधाला प्रति लिटरला 75 रुपये भाव मिळाला पाहिजे. तर म्हशीच्या दुधाला सव्वाशे रुपये प्रति लिटरला भाव मिळाला पाहिजे. ही भाववाढ देणं अवघड नाही. त्यामुळे महागाई वगैरे काही वाढत नाही. उलट शेतकऱ्याला जर भाव मिळाला तर महागाई निश्चितपणे कमी होईल. कारण महागाईची ज्यांना झळ पोहचते ती माणसं शेतीवरती काम करायला येतात. शेतकरी मग त्यांना दोन पैसे देतो, असंही सदाभाऊ खोत यावेळी बोलताना म्हणाले आहेत.(Latest Marathi News)

Milk Price
Nagpur Crime: अपघात की घातपात! खेळताना तीन मुलं झाली बेपत्ता, तिघांचेही मृतदेह आढळले कारमध्ये

सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने रहावं. शेतकरी हा कष्टाळू आणि मायाळू आहे. त्या शेतकऱ्याला जर तुम्ही झिडकारलं तर शेतकऱ्याच्या हातात बळी नांगर आहे हे राज्यकर्त्यांनी कधीही विसरू नये, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.(Latest Marathi News)

Milk Price
पाऊस लांबल्यास पाणी टंचाई अटळ! ३ टीमएसी बचतीसाठी २९ जूनला सुटणार सोलापूर शहरासाठी पाणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()