पितृतुल्य व्यक्तिमत्त्व आबा....

पितृतुल्य व्यक्तिमत्त्व आबा....
Updated on
Summary

लोकनेत्याचे एक पाऊल जनतेसोबत, तर दुसरे पाऊल विकासाच्या दिशेवर असावे लागते. गणपतरावआबांचे व्यक्तिमत्त्व अगदी असेच होते; म्हणूनच सांगोला मतदारसंघातील प्रत्येक मतदाराशी आणि जनतेशी त्यांची वैचारिक गुंफण होती. प्रत्येक निवडणुकीत आबाच निवडून आले पाहिजेत, हाच ध्यास त्यांच्या कार्यकर्त्यांना होता.

- विजयसिंह मोहिते-पाटील माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र

सोलापूर जिल्ह्याच्या सामाजिक, राजकीय जीवनात त्यांचा सल्ला आपण घेत होतो. सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी कार्यरत असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपली राजकीय वाटचाल सुरू झाली. सांगोला विधानसभा मतदार संघात सन १९६७ ते २००४ पर्यंत माळशिरस तालुक्‍यातील २१ गावे समाविष्ट होती. या सर्व गावांमधून त्यांना मताधिक्‍य मिळवण्यासाठी वैयक्तिक पातळीवर आपण कायम प्रयत्न केले. विधानसभा सभागृहात आम्ही दोघांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी एकच भूमिका घेऊन शेवटपर्यंत वाटचाल केली. जिल्ह्यांच्या सहकार क्षेत्रात सहकार महर्षींच्या बरोबरीने कै. सुधाकरपंत परिचारक, कै. ब्रह्मदेव माने आणि आबासाहेबांनी एका विचाराने संस्था नावारूपाला आणल्या होत्या. त्यांच्यासोबत आपल्याला मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली. आबासाहेब हे सोलापूर जिल्हाच नाहीतर महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेते होते. शेतकरी कामगार पक्षाच्या साम्यवादी विचारसरणीचा त्यांच्यावर प्रभाव होता. गोरगरीब जनतेसाठी लोककल्याणकारी राज्य राबविले जावे हा त्यांचा ध्यास होता. साधे राहणी आणि उच्च विचारसरणी त्यांनी आयुष्यभर जपली. मंत्री असतानासुद्धा ते अत्यंत साधेपणानेच रहात असत. पद आज आहे उद्या नाही, राज्यकर्त्यांनी आपली सगळी शक्ती समाजाच्या विकासासाठी राबविली पाहिजे हा त्यांचा ध्यास असायचा. त्यांचा बराचसा प्रवास एसटीने असायचा आणि त्यामुळेच महाराष्ट्रातील जनतेला त्यांच्या कार्यशैलीविषयी प्रचंड कुतूहल होते.

पितृतुल्य व्यक्तिमत्त्व आबा....
तब्बल ११ वेळा आमदार राहिलेले गणपतराव देशमुख यांचं निधन

आबांचे विधानसभेतील अस्तित्व सभागृहाचा बहुमान करणारे होते. सभागृहातील त्यांचे प्रत्येक भाषण त्यांच्या व्यासंगाची साक्ष देत असे. प्रश्न समजावून घेणे, त्याचा चौफेर अभ्यास करणे आणि योग्य पद्धतीने सभागृहात मांडणे हे कौशल्य त्यांच्याकडे होते. अतिशय तरुण वयात सभागृहात प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना मिळाली. त्या संधीचे सोने त्यांनी केले. ५४ वर्षे एखाद्या सभागृहाचे प्रतिनिधित्व करणे ही गोष्ट सामान्य नव्हती. त्यांच्या मतदारसंघातील जनतेने त्यांच्यावर ऋषीतुल्य असे प्रेम केले. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या नंतर मोहिते-पाटील परिवाराला आबांनी फार मोठा आधार दिला. आपण मंत्रिमंडळात काम करीत असताना आबांनी लोकहिताचे अनेक सल्ले आपल्याला दिले. त्यांचा सहकाराचा मोठा अभ्यास होता. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राची व वैयक्तिक मोहिते-पाटील घराण्याची फार मोठी हानी झाली आहे. आम्हा मोहिते-पाटील परिवाराला त्यांच्या जाण्याचा फार मोठा धक्का बसला आहे.

(शब्दांकन ः सुनील राऊत, नातेपुते)

पितृतुल्य व्यक्तिमत्त्व आबा....
राजकारणातील भीष्मपितामह तथा भाईंचा जीवनप्रवास

गणपतराव देशमुख यांचा अल्प परिचय

१० ऑगस्ट १९२७ रोजी पिंपरी (ता. मोहोळ) येथे आजोळी जन्म

शिक्षण - बीए.एल.एल.बी.

पक्ष - भारतीय शेतकरी कामगार पक्ष

मतदारसंघ - सांगोला विधानसभा मतदारसंघ

पितृतुल्य व्यक्तिमत्त्व आबा....
आबासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी रस्त्यांवर मोठी गर्दी

इतर माहिती

१९५७ सालापासून सांगोला कोर्टात वकिलीला सुरुवात

१९६२ च्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने प्रथमच उमेदवारी

१९६२ मध्ये शेकापकडून निवडणूक लढवून काँग्रेसच्या केशवराव राऊत यांचा दोन हजार ५७ मतांनी पराभव करून विधानसभेत प्रवेश

१९६७ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत काकासाहेब साळुंखे यांचा ६७२ मतांनी पराभव

१९७२ मध्ये काँग्रेसचे काकासाहेब साळुंखे-पाटील व १९९५ अशा दोनवेळा शहाजी पाटील यांच्याकडून पराभव

१९८०-८२ साली महाराष्ट्र विधानमंडळाच्या लोकलेखा समितीचे प्रमुख

१९७८-८० मध्ये शरद पवार यांच्या पुलोद सरकारमध्ये कृषी, ग्रामीण विकास, विधी व न्याय खात्याचे मंत्री

१९९०-२००४ या काळात दोनवेळा विधानसभेचे हंगामी सभापती म्हणून काम

१९९९-२००२ मध्ये आघाडी सरकारमध्ये पणन व रोजगार हमी खात्याचे मंत्री

३ ऑगस्ट २०१२ रोजी शेकापला ६५ वर्षे तर आबासाहेबांना विधिमंडळात पन्नास वर्षे पूर्ण

२०१९ सालची विधानसभा निवडणूक न लढविता नातू डॉ. अनिकेत यांना शेकापकडून उमेदवारी

पितृतुल्य व्यक्तिमत्त्व आबा....
'विधानसभेचं विद्यापीठ' म्हणवले जाणारे गणपतराव देशमुख कोण होते?

महाराष्ट्र विधानसभा सदस्य (अकरावेळा निवड)

१६६२-६७, १९६७-७२, १९७४-७८, १९७८-८०, १९८०-८५, १९८५-९०, १९९०९५, १९९९-२००४, २००४-०९, २००९-१४. २०१४-१९.

पुरस्कार

नवी दिल्ली : बेस्ट सिटीजन ऑफ इंडिया.

२००३ : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार

२००४ - सार्वजनिक वाचनालय, नाशिकचा ‘कार्यक्षम आमदार’ पुरस्कार

२००७ - गांधी फोरम संघटना दिल्लीचा ‘आदर्श समाजसेवक पुरस्कार’

२९ जून २००९ - तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाचा ‘जीवनगौरव पुरस्कार’

२०१० : महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ मर्या. मुंबई यांच्या वतीने ’वस्त्रोद्योग महर्षी पुरस्कार’

३० मार्च २०१४ : ’रयत माउली सौ. लक्ष्मीबाई पाटील पुरस्कार’

२६ एप्रिल २०१७ : भारती विद्यापीठ, पुणे यांच्या वतीने ’जीवनसाधना गौरव पुरस्कार’

२ डिसेंबर २०१८ : अग्निपंख फाउंडेशनतर्फे ’डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जीवन गौरव पुरस्कार’

१३ नोव्हेंबर २०२० : किसन वीर सहकारी साखर कारखाना, सातारा यांच्या वतीने ’आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार’

पितृतुल्य व्यक्तिमत्त्व आबा....
समाजवादी विचाराचे संघर्षशील नेतृत्व हरपले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.