पहिल्यांदा राऊतांनी स्वत:ची किंमत ओळखली - निलेश राणे

"आपल्या योग्यतेनुसार नुकसानीची किंमत ठरते"
MP Sanjay Raut
MP Sanjay Rautsakal media
Updated on

मुंबई: संजय राऊत (sanjay raut) यांनी आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrkant patil) यांनी केलेले आरोप फेटाळून लावले. या आरोपांबद्दल आपण चंद्रकांत पाटील यांच्यावर सव्वा रुपयांचा दावा ठोकणार आहोत. तेवढीच त्यांची किंमत आहे, असे राऊत म्हणाले. राऊत यांच्या या विधानानंतर माजी खासदार आणि नारायण राणे (narayan rane) यांचे सुपूत्र निलेश राणे (nilesh rane) यांनी संजय राऊतांना लक्ष्य करणारं टि्वट केलं आहे.

"संजय राऊत मूर्ख आहेत. आपण जेव्हा कोणावर नुकसानीचा दावा टाकतो तेव्हा आपल्या योग्यतेनुसार नुकसानीची किंमत ठरते. संजय राऊत यांची स्वतःची किंमत ही सव्वा रुपये आहे. पहिल्यांदा संजय राऊत यांनी स्वतःची किंमत ओळखली" असं निलेश राणे यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

MP Sanjay Raut
प्रवीण दरेकरांविरोधात रुपाली चाकणकरांची पोलिसात तक्रार

राऊतांच्या सव्वा रुपयांच्या विधानावर चंद्रकांत पाटील म्हणाले...

राऊत (Sanjay Raut) माझे चांगले मित्र असल्याने मानहानीची किंमत थोडी वाढवावी असा मिश्किल चिमटा चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काढला आहे. राजकारणात एकमेकांना बोलावं लागतं. आम्ही एकमेकांना चिमटा काढतो पण किंमत नाही. मी पत्र लिहिलं त्यावरही त्यांनी टीका केली. जेव्हा संधी मिळेल तेव्हा बोलतात. टीका करतात. रोज बोलणारे, लिहिणारे असा पुरस्कार मी संजय राऊतांना देईन. शिवसेनेत इतर नेतेही आहेत पण ते कोणीच बोलत नाहीत. हे मात्र रोज सकाळी येऊन बोलतात. त्यांचा स्टॅमिना इतका आहे की, त्यांना आधी तयारी करावी लागते. रोज हेडलाइन देतात. मात्र हे सगळं असूनही राऊत माझे मित्र असल्यानं मानहानीची किंमत थोडीशी वाढवावी, अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()