Babanrao Dhakne Passed Away : माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचं निधन

माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे.
Babanrao Dhakne Passed Away
Babanrao Dhakne Passed Away
Updated on

माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. बबनराव ढाकणे यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी गुरुवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. अहमदनगर येथील एका खाजगी रुग्णालयात मागील काही आठवड्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना निमोनियाने ग्रासले होते त्यातच त्यांची प्रकृती खालावली होती. यानंतर त्यांना हृद्यविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

ढाकणे यांचं पार्थिव आज पाथर्डी येथील हिंदसेवा वसतिगृहामध्ये आज दुपरी एक ते उद्या दुपारी एक वाजेपर्यंत अंतदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून शनिवारी दुपारी दोन वाजता पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव याव येथे अंत्यसंस्कार केले जातील.

Babanrao Dhakne Passed Away
Maratha Reservation:...तर पंतप्रधान मोदींचं विमान शिर्डीत उतरू दिलं नसतं; मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?

संघर्ष योद्धा नावाने ओळखले जाणारे ढाकणे यांनी पंचायत समितीपासून ते जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा असा राजकीय प्रवास रेला. बबनराव ढाकणे चार वेळेस आमदार आणि खासदार म्हणून ते लोकसभेवर निवडूनही गेले होते. राज्यात बांधकाम विभाग, ग्रामविकास विभागाचे मंत्रिपदही त्यांनी भूषवले होते. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या कार्यकाळात ते राज्यमंत्री होते. जनता दल, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षांतही त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या.

Babanrao Dhakne Passed Away
Amala Paul Engaged: भोला फेम अमाला पॉलनं उरकला साखरपूडा! कोण आहे होणारा नवरा?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()