भाजप मोठा भाऊ पण लहान भावांची चलती, 'असा' ठरला विधीमंडळ समित्यांचा फॉर्म्युला

Formula of Legislative Committee
Formula of Legislative Committee
Updated on

Formula of Legislative Committees: राज्यात सध्या ट्रिपल इंजिन सरकार आहे. भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहेत. दरम्यान भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये ५०:२५:२५ प्रमाणात समित्यांचे वाटप होणार आहे. आमदारांच्या संख्येनुसार विधानसभा व विधानपरिषद समित्यांचे वाटप होईल अशी माहिती मिळाली आहे.

महायुती समन्वय समितीच्या आजच्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय होणार आहे. महायुतीची समन्वय समिती आज दुपारी ३.३० वाजता पत्र देणार असून विधानसभा व विधानपरिषदेच्या एकूण २८ समित्यांवर आमदारांची नेमणूक होणार आहे.

विधानसभा अध्यक्ष व विधानपरिषद उपसभापतींना महायुतीचे नेते भेटणार आहेत. विशेष अधिकार समिती, पंचायत राज समिती, रोजगार हमी योजना समिती,आश्वासन समिती, यासह एकूण २५ समित्या विधानमंडळातर्गंत कार्यरत असतात. या समित्यांचे अध्यक्ष व सदस्य पदांची यादी समन्वय समिती विधीमंडळात देणार असल्याची माहिती मिळाली आहे. यापूर्वी महामंडळे आणि विविध शासकीय समित्यांवरील नियुक्यांमध्ये ६०:२०:२० चा फॉर्म्युला असावा अशी मागणी भाजपने केली होती. (latest marathi news)

Formula of Legislative Committee
Yashomati Thakur: यशोमती ठाकुरांची तुलना थेट इंग्रजांशी; भाजप खासदाराच्या वादग्रस्त विधानामुळं वाद पेटणार

मात्र तीन पक्षांमध्ये भाजपला ५० शिवसेनेला २५ टक्के आणि राष्ट्रवादीला २५ टक्के असे वाटप निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजप ५० शिवसेना २५ आणि राष्ट्रवादी २५ असा आग्रह शिवसेना आणि राष्ट्रवादीने धरला आणि या मागणीला आता मान्यता मिळाल्याची माहिती आहे. आज याबाबत चित्र स्पष्ट होणार.

Formula of Legislative Committee
ShivSena Dasara Melava: ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच! शिंदे अर्ज घेणार मागे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.