महाविकास आघाडीकडून ओबीसींची फसवणूक : प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर : मागासवर्गीय आयोगाचे अधिकार काढले
Fraud with OBC co from Mahavikas Aghadi Prakash Ambedkar mumbai
Fraud with OBC co from Mahavikas Aghadi Prakash Ambedkar mumbaiesakal
Updated on

मुंबई : मागासवर्गीय आरक्षणासाठी समर्पित आयोग नेमताना ओबीसींसाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाचे अधिकार काढून घेऊन हा नवीन ‘समर्पित’ या नावाने ५ जणांचा आयोग नेमणे, ही निव्वळ ओबीसींची फसवणूक असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी केला.

सर्वोच्च न्यायालयाने शास्त्रीय पद्धतीने ओबीसींची पाहणी करून मागसलेपणाचे मोजमाप करणारा डेटा गोळा करायला सांगितले आहे. त्यासाठीची कोणतीही यंत्रणा निर्माण करण्याऐवजी सरकार जनता, पक्ष, संघटनांकडे माहिती मागवत आहे. या माहितीचा इम्पिरिकल डेटा तयार करण्यासाठी काही उपयोग होणार नाही. या अगोदर सर्वोच्च न्यायालयात सादर केलेला डेटा न्यायालयाने फेटाळला. कारण तो शास्त्रीय पद्धतीने गोळा केलेला नव्हता. हा केवळ वेळकाढूपणा आणि ओबीसींची दिशाभूल सुरु आहे, असेही आंबेडकर यांनी यावेळी नमूद केले.

‘ट्रिपल टेस्ट’ न लावता सादर केलेला राज्य सरकारचा बोगस ‘इम्पिरिकल डेटा’ सर्वोच्च न्यायालयाने डस्टबीन मध्ये टाकला. सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समूह पुन्हा आरक्षणापासून वंचित राहणार आहे. ओबीसी समाजाचे मागासलेपण सिद्ध करणारी आकडेवारी सरकारकडे नव्हती. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी राज्य सरकारने त्यांच्याकडील विविध संस्थांचा डेटा सादर केला होता. सदर आकडेवारी ही विविध योजनांची होती. त्यामुळे राजकीय प्रतिनिधित्व सिद्ध होत नाही.

सर्वोच्च न्यायालयाने ‘ट्रिपल टेस्ट’ करायला सांगितली असतानाही त्याची पूर्तता न करता सरकारने बोगस इम्पिरिकल डेटा सादर केला. ही अत्यंत गंभीर बाब असून सरकारला आणि सरकारच्या कायदेशीर तज्ज्ञांना ती समजली असतानाही केवळ आरक्षणाला विरोध असल्यानेच न्यायालयात डेटा सादर केला.

- प्रकाश आंबेडकर, नेते, वंचित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.