Devendra Fadnavis : राज्यातील जनतेला राज्य सरकारचं मोठं गिफ्ट; फडणवीसांनी दिली माहिती

देवेंद्र फडणवीस नागपूर येथे बोलत होते.
Devendra Fadanvis
Devendra Fadanvis Esakal
Updated on

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ५०० आपला दवाखाना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार, आज ३०० आपला दवाखानांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी माहिती दिली आहे.(Free Treatment 8 Crore People Of The State Devendra Fadnavis Informed)

देवेंद्र फडणवीस नागपूर येथे बोलत होते. यावेळी त्यांनी, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा केलेल्या विस्ताराबाबत सांगितले.

Devendra Fadanvis
Nana Patole: भावी मुख्यमंत्री पदाच्या NCPच्या दाव्यावर नाना पटोले संतापले; दिला इशारा

राज्यातील जनतेला राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या नेतृत्त्वात आणखी एक चांगली योजना सुरू झाली आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ५ लाखांपर्यंतचा इलाज मोफत केला आहे.

पंतप्रधान जनआरोग्य योजनेतून ५ लाखांचे उपचार मोफत मिळत आहेत आणि आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ५ लाखांचे उपचार मोफत होत आहेत. यातून जवळपास ९०० ऑपरेशन्स आणि उपचार मोफत मिळणार आहेत.

Devendra Fadanvis
Apmc Election Result: कर्जत बाजार समितीवर पुन्हा भाजपची सत्ता? राम शिंदेंनी सांगितला फॉर्म्युला

त्यामुळे महाराष्ट्रातील १२ कोटींपैकी ८ कोटी लोकांना मोफत उपचार देणार आहोत. किडनी प्रत्यारोपणासाठी चार लाखांपेक्षा जास्त पैसे या योजनेतून देण्यात येतात. सामान्य माणसावर आरोग्याचा बोजा पडू नये याचा विचार आम्ही करत आहेत. या योजनेतील रुग्णालयांची संख्या वाढवत आहोत”, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.

आपलं दवाखानाविषयी माहिती देताना ते म्हणाले, वेगवेगळ्या सेवा मोफत देण्यात येणार आहे. दवाखान्यात विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शनही मोफत देण्यात येणार आहे. सामान्य माणसाच्या आरोग्याची काळजी घेण्याचा उपक्रम सुरू होतोय, असंही फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.