मुंबई : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे (Narayan Rane) यांची ईडीनं चौकशी सुरु केल्यानं घाबरून जाऊन ते भाजपला सरेंडर झाले, असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केला आहे. मुंबईत नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला, त्यानंतर काही वेळातच विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली आणि राणेंवर पलटवार केला. (Frightened by ED inquiry Narayan Rane surrendered to BJP slams Vinayak Raut)
विनायक राऊत म्हणाले, "भाजप नेते किरिट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी नारायण राणे यांच्याविरोधात १०० बोगस कंपन्या निर्माण केल्याचा आरोप केला होता. सोमय्यांच्या या आरोपांनंतर नारायण राणे यांच्यामागे ईडीची चौकशी लागली. या चौकशीला घाबरुन त्यांनी लाचारी पत्करली आणि भाजला शरण आले. पण ईडीपासून त्यांचा अद्याप बचाव झालेला नाही. परंतू आम्ही शिवसेनेचे सर्व खासदार ईडीच्या कार्यालयाला भेट देऊन सोमय्यांनी जे आरोप केलेत त्यांची सखोल चौकशी झाली का? झाली नसेल तर ती केव्हा करणार? याची विचारणा करणार आहोत. येत्या एक-दोन दिवसांतच आम्ही ईडीच्या संचालकांना भेटणार आहोत"
सोमय्या आज इतरांवर आरोप करत आहेत पण त्यांनी यापूर्वी नारायण राणेंवर जे आरोप केले होते त्याची देखील ते पुन्हा ईडीला माहिती देतील, अशी आम्हाला आशा आहे. राणेंना आता भाजपचा खूपच पुळका आलेला आहे. पण याच राणेंनी काँग्रेसमध्ये असताना विधानसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आश्लाघ्य आरोप केले होते. नितेश राणे यांनी देखील सोमय्यांवर आरोप करताना ते किती मराठी द्वेष्ट्ये आहेत हे सांगितलं होतं तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही त्यांनी टीका केली होती, असंही राऊत यांनी यावेळी सांगितलं.
भाजपचे सिंधुदुर्गचे अध्यक्ष राजन तेली यांचे चिरंजीव प्रथमेश तेली हे एकदा कोकण रेल्वेने कणकवलीला चालले होते. त्यावेळी दादरच्या रेल्वे स्थानकात काही गुंडांनी त्यांच्यावर हल्ला करत त्यांना भरधाव रेल्वेखाली ढकललं होतं. या जीवघेण्या प्रकारामागे नितेश राणेंचं नाव आलं होतं, असा आरोपही यावेळी राऊत यांनी केला. तसेच नारायण राणेंनी पत्रकार परिषदेतून जी आगपाखड केली त्याची पोलखोल आम्ही आज केली. पण हा पहिला टप्पा होता, यापुढे वर्षभर आम्ही दर महिन्याला एक-एक पोलखोल करु शकतो, असंही यावेळी विनायक राऊत म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.