Sanjay Raut : झाकिर नाईककडून संस्थेला कोट्यवधीचा निधी; राऊतांच्या आरोपावर विखेपाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Sanjay Raut and Radhakrushna Vikhe Patil
Sanjay Raut and Radhakrushna Vikhe Patil
Updated on

अहमदनगर - देशद्रोहाचे आरोप असलेला आणि सध्या फरारी असलेला वादग्रस्त धर्मगुरू झाकिर नाईक याने राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रवरा येथील संस्थेला साडेचार कोटींची देणगी दिल्याच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या आरोपात तथ्य नाही. ही देणगी कायदेशीरदृष्ट्या नियमित असून यासंदर्भात यापूर्वीच सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशी केली होती. त्यात कोणतेही तथ्य आढळले नाही, असा खुलासा विखे पाटील यांनी केला.

Sanjay Raut and Radhakrushna Vikhe Patil
Milk Rate : दूधाच्या कमाल दराबाबत राधाकृष्ण विखेपाटील यांची महत्त्वपूर्ण माहिती; म्हणाले...

ते म्हणाले की, मी त्या संस्थेचा घटक असल्याने जबाबदारी झटकणार नाही; मात्र यासंदर्भात केंद्रीय यंत्रणांनी त्याचवेळी चौकशी केली होती. त्यात कोणतीही अनियमितता आढळली नाही. त्यामुळे हा विषय तिथेच संपला आहे.

यासंदर्भात अजूनही काही शंका असल्यास मीच ईडीकडे पत्र देऊन चौकशीची मागणी करेन. देणगी दिली त्यावेळेस नाईक याच्यावर देशद्रोहाचे कोणतेही आरोप नव्हते. चौकशीनंतर आरोप ठेवण्यात आले.

राऊतांच्या डोक्यावर परिणाम

राऊत यांच्या आरोपांवर ते म्हणाले,‘‘ राऊत यांचे माझ्यावरील प्रेम सध्या भलतेच वाढले आहे; मात्र ते जे रोज सकाळी उठून बरळतात याचा अर्थ त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करावे, असा माझा सल्ला आहे.‘‘

Sanjay Raut and Radhakrushna Vikhe Patil
Uddhav Thackeray : बाळासाहेब म्हणत असतील माझ्याच लेकाने….;पाटण्यातील गेलेल्या ठाकरेंवर भाजपचा हल्ला

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत अनियमितता झाल्याचा आरोप केला आहे. याबाबत विखे पाटील म्हणाले की,‘‘घोटाळेबाजांनी केलेल्या आरोपांबाबत खुलासा करण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. ज्या अधिकाऱ्यांच्या मुदतपूर्व बदल्या झाल्या अशांनीच मॅटमध्ये दाद मागितली आहे. त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.