Video: शेवटी आईच ती! पुलाअभावी जेसीबीच्या बकेटमध्ये बसून गरोदर मातेने पार केला नाला, हाच का तो विकास ?

Maharashtra Development: आलापल्ली ते भामरागड या राष्ट्रीय महामाग्गावर रहदारी पूर्णपणे बंद झाली आहे. याचा फटका या गरोदर मातेला बसला.
Gadchiroli a pregnant mother crossed the canal by sitting in a JCB bucket  absence of a bridge vidarbha
Video: शेवटी आईच ती! पुलाअभावी जेसीबीच्या बकेटमध्ये बसून गरोदर मातेने पार केला नाला, हाच का तो विकास ?sakal
Updated on

Gadchiroli: देशात प्रगतीचे ढोल पिटले जात असले, तरी गडचिरोली जिल्ह्यातील नागरिक आजही साध्या दळणवळणाच्या सोयीपासूनही किती दूर आहेत, याची प्रचिती भामरागड तालुक्यात आली.

मुसळधार पावसामुळे खळाळून वाहत असलेल्या नाल्याला पार करणे अशक्य झाल्याने अखेर येथील एका गरोदर महिलेला चक्क जेसीबीच्या बकेटमध्ये अर्थात पुढच्या फावड्यात बसून हा नाला पार करावा लागला. जेवरी संदीप मडावी (वय २२)रा. कुडकेली ता.भामरागड असे या गरोदर महिलेचे नाव आहे.

आलापल्ली ते भामरागड या १३०-डी क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर ऐन पावसाळ्याच्या तोंडावर विविध ठिकाणी पुलांचे बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र, रहदारीसाठी पर्यायी मार्ग व्यवस्थित आणि मजबूत न केल्याने मागील दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे पर्यायी मार्ग वाहून गेला. त्यामुळे दोन दिवसापासून आलापल्ली ते भामरागड या राष्ट्रीय महामाग्गावर रहदारी पूर्णपणे बंद झाली आहे. याचा फटका या गरोदर मातेला बसला आहे.

गुरुवार (ता. १८)मध्यरात्री झालेल्या पावसामुळे नाल्यांना पूर आल्याने शुक्रवार (ता. १९) सकाळी १० वाजताच्या सुमारास आलापल्ली- भामरागड महामार्गावर जेवरी मडावीला नाला पार करायला जेसीबीचा आधार घ्यावा लागला. २७ जुलै रोजी तिची प्रसूतीची तारीख होती. मात्र, १९ जुलैलाच सकाळी तिला प्रसववेदना सुरू झाल्या. त्यामुळे सुमदाय आरोग्य अधिकारी व परिचारिका तिला रुग्णवाहिकेतून भामरागड ग्रामीण रुग्णालयात घेऊन जात होत्या. मात्र वाटेत मोठा नाला लागला. गुरुवारीच मुसळधार पाऊस कोसळल्याने या नाल्यातून पाणी वाहत होते.

Gadchiroli a pregnant mother crossed the canal by sitting in a JCB bucket  absence of a bridge vidarbha
Gadchiroli Video Viral : रस्त्याअभावी गरोदर मातेचे हाल; जेसीबीच्या बकेटमध्ये बसवून पूल पार करण्याची नामुष्की

त्यामुळे रहदारी अशक्य होती. रुग्णवाहिका पुढे नेता येत नसल्याने शेवटी जेसीबीच्या बकेटमध्ये महिला व तिच्या पतीला बसवून पैलतिरावर सोडण्यात आले. आलापल्ली- भामरागड राष्ट्रीय महामार्गाचे (क्र.१३० डी) सध्या बांधकाम सुरू आहे. या नाल्यावर बांधकामासाठी जेसीबी होता. त्यात बसून हा नाला ओलांडल्यानंतर जेवरी मडावीला दुसऱ्या रुग्णवाहिकेतून भामरागड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावरून गडचिरोली जिल्ह्यात पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्य समस्या किती उग्ररूप धारण करते याची प्रचिती येते.

Gadchiroli a pregnant mother crossed the canal by sitting in a JCB bucket  absence of a bridge vidarbha
Gadchiroli : उत्तर गडचिरोलीतून नक्षलींचे अस्तित्व समाप्त;पोलिस अधीक्षकः ८६ लाखांचे बक्षीस असलेले १२ नक्षलवादी ठार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com