Video : जखमी वडिलांसाठी मुलगा बनला 'श्रावण बाळ'! खाटेची केली 'कावड' अन् नेलं रुग्णालयात

अतिवृष्टीचा आणि पुराचा फटका भामरागड तालुक्याला बसला असून अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे.
Rain
Rain
Updated on

गडचिरोली : मुसळधार पावसानं महाराष्ट्राला गेल्याकाही दिवसांपासून चांगलंच झोडपून काढलं आहे. विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातील अतिदृर्गम अशा भागात एक व्यक्ती जखमी झाला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यासाठी त्याच्या मुलाला मोठी कसरत करावी लागली. आधुनिक काळातला श्रावण बाळ होत खाटेची कावड करुन त्यानं वडिलांना रुग्णालयापर्यंत पोहोचवलं आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे.

Rain
'आरक्षणाची 50 टक्के मर्यादा काढून टाका'; राजर्षी शाहू महाराजांच्या आदेशाचा दाखला देत राहुल गांधींची मागणी

अतिवृष्टीचा आणि पुराचा फटका भामरागड तालुक्याला बसला असून अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. मालू मज्जी हे शेतात घसरून पडल्यानं त्यांच्या पायाला मोठी दुखापत झाली होती. त्यामुळं प्रचंड वेदनेनं विव्हळत होते. वडिलांचं हे दुःख सहन न झाल्यानं मुलानं त्यांना कसंही करुन रुग्णालयात उपचारांसाठी नेण्याचा निर्णय घेतला.

मात्र, कुठलंही वाहन नसल्यानं खाटेची कावड तयार करून वडिलांना त्यावर झोपवून 18 किलोमीटरचा चिखल तुडवत त्यानं प्रवास केला. वाटेत त्याला तुडुंब भरलेली नदी पार करायची होती. त्यासाठी लहानशा होडीतून पलीकडे जाऊन त्यानं वडिलांना रुग्णालयात दाखल केलं. उपचारानंतर त्याच कावडीवरुन वडिलांना घेऊन तो भटपार इथं आपल्या गावी परतला.

Rain
iPhone Price: ॲपलची ग्राहकांना मोठी भेट! iPhoneच्या किमती केल्या कमी, 6000 रुपयांनी होणार स्वस्त, पहा नवीन किंमत

दरम्यान, भामरागड तालुका हा नक्षलग्रस्त आणि अतिदुर्गम जंगलांचा भाग म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी पाऊसही मोठ्या प्रमाणावर पडतो, पावसाळ्यात इथल्या नद्यांना हमखास पूर येतो. यंदाही मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यानं इथं वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या लोकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला आहे. नद्यांना पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटल्याच्या घटना यंदाच्या पावसाळ्यात पहायला मिळाल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.