छप्पर उडालेल्या बसचा Video Viral! महामंडळाकडून खुलासा; अभियंता निलंबित
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आगारातील एसटी बसचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या बसचे छप्पर उडत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत होते. व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी एसटी महामंडाळावर टीका केली. त्यानंतर आता महामंडळाने या व्हिडिओप्रकरणी खुलासा केला असून संबंधीत अभियंत्याला निलंबित केलं आहे.
दरम्यान, सदर बसच्या दुरूस्तीचे काम विभागीय कार्यशाळेमध्ये विहीत वेळेत पूर्ण न केल्यामुळे संबंधीत विभागाचे यंत्र अभियंता शि. रा. बिराजदार यांना महामंडळाने निलंबित केले आहे. बसचे काम वेळेत पूर्ण न करणे, बस त्रुटीसह वाहतुकीसाठी उपलब्ध करुन दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
पुढील चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन बसेस मार्गस्थ कराव्यात असे निर्देश आगार व्यवस्थापनाला देण्यात आले आहे. यासंबंधीचे खुलासा पत्र आता समोर आले आहे.
काय होतं व्हिडिओमध्ये?
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आगाराची ही बस असून गडचिरोली - अहेरी या मार्गावर धावत असताना या बसचा व्हिडिओ शूट करण्यात आला होता. यामध्ये या बसचे छप्पर उडाल्याचं दिसत होतं. सुदैवाने बसचे छप्पर तुटून अर्ध्यातच अडकल्याने मोठी दुर्घटना टळली.
लालपरीची दयनीय अवस्था
अतिमागास अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय व्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. पावसाळ्यात बसमध्ये पाणी गळणे, बस रस्त्यात बंद पडणे हे नित्याचेच झालेले असताना बुधवारी (ता. २६) चालत्या बसचे चक्क छप्परच उडाले. गडचिरोलीवरून अहेरीकडे जात असलेल्या या बसचे छप्पर चामोर्शी मार्गावर उडाले. अर्धवट छप्पर तुटलेल्या अवस्थेतच ही बस काही किलोमीटर तशीच धावत राहिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.